AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळं मांजर आडवं जाणं शुभ की अशुभ? जाणून घ्या कोणत्या गोष्टीचे संकेत मानले जातात

मांजराशी संबंधित समजुती लोकविश्वासाचा भाग आहेत. मांजर रस्तात आडवं गेलं की प्रत्येक वेळी अशुभ असते असे नाही. बऱ्याचदा हे फक्त योगायोग असतात, ज्यांना आपण वर्षानुवर्षे संकेतांमध्ये बदलले आहे.

काळं मांजर आडवं जाणं शुभ की अशुभ? जाणून घ्या कोणत्या गोष्टीचे संकेत मानले जातात
CatImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 15, 2025 | 1:04 PM
Share

भारतात रोजच्या जीवनात काही समजुती अशा आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या लोकांच्या वर्तनावर परिणाम करत आल्या आहेत. त्यापैकी एक खूप प्रचलित समजूत आहे – मांजर रस्तात आडवं येणं हे अशुभ मानले जाते. बऱ्याचदा असे दिसते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला मांजर आडवे गेले तर तो तिथेच थांबतो किंवा दुसऱ्या कोणाला आधी रस्ता ओलांडू देतो. आता हे शुभ की अशुभ हे जाणून घेऊया ज्योतिषांकडून…

जेव्हा एखादे मांजर व्यक्तीला आडवे जाते किंवा त्याच्या समोरून रस्ता ओलांडते, तेव्हा काही लोक याला संकेत मानतात की पुढे काही अडचण येऊ शकते. विशेषतः जेव्हा मांजर डावीकडून येऊन उजवीकडे जाते. या समजुतीची सुरुवात कधी आणि कशी झाली, याचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही, पण समाजात हा विश्वास खूप खोलवर रुजलेला आहे.

वाचा: सचिन तेंडुलकरची सून एका Dog Bathचे किती पैसे घेते? अर्जुनच्या होणाऱ्या पत्नीचे लग्झरी पेट सलून

मांजर हा खूप सावध प्राणी आहे. तिला थोडेही वेगळे संकेल मिळाले तर ती सतर्क होते. बऱ्याचदा ती अशीच थांबते किंवा मागे फिरते. काही लोकांचा असा विश्वास आहे की मांजराला जर काही अनिष्टाची चाहूल लागली, तर ती रस्ता सोडते. याच कारणामुळे तिच्या वर्तनाला लोक भविष्यातील एखाद्या घटनेशी जोडतात.

तंत्र आणि ज्योतिषातील मांजराची भूमिका

काही परंपरांमध्ये मांजराला रहस्यमय शक्तींशी जोडले जाते. तांत्रिक पद्धतींमध्ये मांजराला विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की जर मांजर घरात येऊन रडू लागली, तर हे काही अडचणीचे संकेत असू शकते. त्याचप्रमाणे, दोन मांजरींचे आपसात भांडण होणे हे घरगुती वाद किंवा आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, मांजराला राहू ग्रहाशी जोडले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत राहूशी संबंधित समस्या असतात, त्यांना मांजर पाळण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे काही नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात असे मानले जाते.

मांजर शुभ संकेतही देते

प्रत्येक वेळी मांजर दिसणे अपशकुन नसते. अनेक समजुतींनुसार, जर दिवाळीच्या रात्री मांजर घरात आली, तर हे लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे, जर तिने आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी एखादे घर निवडले, तर ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आणखी एक रंजक समजूत अशी आहे की, जर एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी जात असेल आणि रस्त्यात मांजर तोंडात मांसाचा तुकडा घेऊन दिसली, तर हे यशाचे लक्षण आहे.

मांजर आणि आरोग्याशी संबंधित समजुती

जर एखादी व्यक्ती झोपलेली असेल आणि मांजर तिचे डोके किंवा पाय चाटू लागली, तर हे चांगले लक्षण मानले जात नाही. यामुळे आजार किंवा कोणत्या वादात अडकण्याची शक्यता मानली जाते. विशेषतः जर मांजर डोक्यावरून उडी मारली, तर याचा संबंध मानसिक तणावाशी जोडला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता