AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्य दरवाजाच्या अगदी समोर लिफ्ट असणे शुभ आहे की अशुभ?

आजकाल अपार्टमेंटमध्ये एखाद्या फ्लॅटसमोर किंवा त्या घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असतेच असते. पण हे अनेकांना माहित नसेल की ही स्थिती अशुभ मानली जाते. घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असल्याने नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असणे फेंगशुई आणि वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट का नसावी आणि असली तर त्यासाठी काय उपाय करावा हे जाणून घेऊयात.

मुख्य दरवाजाच्या अगदी समोर लिफ्ट असणे शुभ आहे की अशुभ?
Is it auspicious or inauspicious to have an elevator in front of the main doorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 5:08 PM
Share

आजकाल नवीन बांधलेल्या इमारती असो किंवा बहुकेतदा जुन्या इमारतींमध्येही, अपार्टमेंटमध्ये लिफ्ट या असतातच. ज्या उंच इमारतींमध्ये तर लिफ्टशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे आता अगदी 5 ते 7 माळ्यांच्या अपार्टमेंटमध्ये देखील येजा करण्यासाठी लिफ्टची सोय असतेच. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की आपल्याला रोजच्या वापरात असणारी किंवा आपलं येण-जाणं सोयीचं करणारी ही लिफ्ट अडचणीतही आणू शकते. होय,फेंगशुईनुसार लिफ्ट असलेली जागा घरासाठी चुकीची ठरू शकते. कशी ते जाणून घेऊयात.

फेंगशुईनुसार, तसेच वास्तूशास्त्रानुसार लिफ्ट कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर नसावी. ते अशुभ मानले जाते. त्यामुळे घर खरेदी करताना याचा नक्कीच विचार करावा. पण लिफ्ट घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर का नसावी यामागे बरीच कारणे आहेत. ती कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात.

दारासमोर लिफ्ट का नसावी?

फेंगशुईनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही लिफ्ट असू नये, कारण यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा घरमालकाच्या, घरप्रमुखाच्या नशिबावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. हे अपरिहार्य आहे, कारण एका मजल्यावर सामान्यतः एक किंवा अधिक फ्लॅट असतात. एखाद्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लिफ्ट असणे अनिवार्य असतेचय पण त्यासाठी घर खरेदी करताना शक्यतो असे लिफ्ट अगदीच समोर आहे असे फ्लॅट घेणे टाळावे.

मुख्य दरवाजासाठी फेंगशुई टिप्स

फेंगशुईनुसार, जर घराच्या दारासमोर लिफ्ट येत असेल तर ते अशुभ मानलं जातं. पण जर ही परिस्थिती टाळणे शक्य नसेल तर काय करता येईल हे देखील जाणून घेऊयात. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे मुख्य दरवाजाच्या वर अष्टकोनी आरसा ठेवल्याने समस्या येणार नाहीत. लिफ्टमधून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कोणतीही नकारात्मक ऊर्जा त्या आरशामुळे घरापर्यंत येणार नाही. कारण काच नकारात्मक ऊर्जा लगेच आकर्षित करते. त्यामुळे अनेकदा अचानक काच फुलट्याच्या घटना घडतात. याचा अर्थ त्या काचेने ती नकारात्मकता घेतल्याने ती फुटते आणि आपलं संरक्षण होतं.

दारासमोर लिफ्ट असल्यास काय उपाय करावे?

हा आरसा दरवाजाच्या बाहेरील बाजूस असणे महत्वाचे आहे. घराबाहेर हिरवीगार झाडे देखील लावता येतात, ज्यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. याव्यतिरिक्त, मुख्य दरवाजासमोरील जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवावी. लिफ्टमुळे, बरेच लोक मुख्य दरवाजाजवळून जातात, ज्यामुळे प्रत्येकाच्या उर्जेचा परिणाम होतो. म्हणून, हे उपाय अंमलात आणणे अत्यंत महत्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही) 

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.