घराच्या मुख्य दरवाजाजवळ या 5 गोष्टी ठेवा, नकारात्मक ऊर्जा अन् वाईट नजर घरात येणार नाही
प्रत्येकालाच आपल्या घरात सुख आणि समृद्धी, शांतता हवी असते. नकारात्मकता नसावी, घरात आनंद असावा अशी सर्वांची इच्छा असते, पण कधी कधी घरात विनाकारण कलह, वाद निर्माण होतात. त्यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दाराजवळ काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर दूर होते.

प्रत्येकालाच आपल्या घरात सुख आणि समृद्धी, शांतता हवी असते. विशेषत: सकारात्मक ऊर्जा हवी असते. कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर कधीही आपल्या घरात येऊ नये हीच सर्वांची इच्छा असते. त्यासाठी लोक विविध उपाययोजना करतात. अगदी घरातील पूजा करण्यापासून ते धूप-दीप लावेपर्यंत सगळे उपाय करतात. पण कधी कधी सगळे उपाय करून किंवा वास्तूचे सगळे नियम पाळूनही घरात विनाकारण कलह, आर्थिक नुकसान होते. मानसिक अस्वस्थता यासारख्या समस्या वाईट नजरेमुळे देखील उद्भवू शकतात.
या सर्व समस्यांसाठी एक उपाय सर्वजन नक्कीच करू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजाजवळ काही खास गोष्टी ठेवल्या तर या समस्या दूर होतात आणि घरात सकारात्मकता वाढते. त्या कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
मुख्य प्रवेशद्वारावर या वस्तू ठेवाव्यात
नारळ किंवा शंख
हा एक सोपा पण प्रभावी उपाय मानला जातो ते म्हणजे मुख्य दाराजवळ किंवा दाराच्या वर जागा असेल तर नारळ एका कापड्यात बांधून ठेवावा किंवा शंख ठेवावा त्यामुळे घरात समृद्धी आणि पवित्रता राहते. या दोन्ही वस्तू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाताता. यांपैकी एक वस्तू लाल कापडात गुंडाळा आणि दारावर लटकवा आणि दररोज त्याला धूप दाखवा. तसेच शंख ठेवायचा असल्यास तो गंगाजलाने स्वच्छ करून ठेवावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
स्वस्तिक किंवा ओम चिन्ह
हिंदू धर्मात, स्वस्तिक आणि ओम हे चिन्ह शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत. त्यांना लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून दारावर लावा आणि दररोज त्याची पूजा करा. या चिन्हांना दाराच्या उजव्या बाजूला लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शुभ ऊर्जा येते.
लिंबू-मिरची बांधणे
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू-मिरी बांधणे हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. आणि शक्यतो प्रत्येकाच्या घरात हा उपाय केलाही जातो, फक्त त्यात खंड पडू देऊ नये. दर शनिवारी किंवा मंगळवारी एक नवीन लिंबू-मिरीचीची माळ लावावी. दाराच्या मध्यभागी ही माळ लटकवा.
सर्वात महत्वाची गोष्ट
या उपायांचा अवलंब करण्यासोबतच, तुमच्या मुख्य दरवाजाजवळील जागा नेहमी स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास दारात रांगोळी काढा. तुटलेल्या किंवा गंजलेल्या वस्तू ठेवणे टाळा. तसेच दाराजवळ रोज दिवा लावा. असे मानले जाते की दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होते. शिवाय, जर या तीन शुभ वस्तू ठेवल्याने घरात नेहमीच सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
