AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janmashtami 2023 : या विशेष योगात साजरी होणार जन्माष्टमी, पूजा विधी आणि महत्त्व

या विशेष दिवशी रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकाला विशेष लाभ होतो. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी होणारी श्री कृष्ण जन्माष्टमी या वेळी विशेष मानली जाते.

Janmashtami 2023 : या विशेष योगात साजरी होणार जन्माष्टमी, पूजा विधी आणि महत्त्व
जन्माष्टमी
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 06, 2023 | 10:53 AM
Share

मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमीला (Janmashtami 2023) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या विशेष दिवशी रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकाला विशेष लाभ होतो. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी होणारी श्री कृष्ण जन्माष्टमी या वेळी विशेष मानली जाते. पुराणानुसार,  अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. या वर्षी 6 सप्टेंबरला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असून बुधवारी चंद्र वृषभ, रोहिणी नक्षत्रात असल्यामुळे 30 वर्षांनी विशेष योग तयार होत आहे. म्हणूनच या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी ही सुख, समृद्धी आणि इच्छित परिणाम देणारी मानली जाते.

अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणीचे शुभ नक्षत्र

यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी, अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र मध्यरात्री जुळत असून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9.20 ते 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10.25 पर्यंत राहील. रोहिणी ही चंद्राची पत्नी मानली जाते आणि या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल. उपासनेच्या योगामुळे ग्रहांची ही स्थिती विशेष फलदायी ठरत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात केलेली उपासना भक्तांना विशेष फळ देईल.

गृहस्थांनी जन्माष्टमी कधी साजरी करावी?

06 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा करणे गृहस्थांसाठी शुभ राहील. या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथीचा शुभ मुहूर्तही तयार होत आहे. बाळ गोपाळांचा जन्म मध्यरात्री झाला. स्मार्त पंथाचे लोकं आणि वैष्णव पंथाचे लोकं वेगवेगळ्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतात कारण दोन्ही पंथाचे लोक कॅलेंडरमध्ये नमूद केल्याप्रमाणे हा सण वेगवेगळ्या वेळी साजरा करतात. स्मार्त पंथ उदय तिथीला फारसे महत्त्व देत नाही. तर वैष्णव संप्रदाय उदयकालावर निश्चित केलेल्या वेळेवर विश्वास ठेवतात.

श्रीकृष्णाची पूजा कशी करावी?

या वर्षी नक्षत्रात विशेष ग्रह असल्यामुळे जन्माष्टमी अतिशय शुभ मानली जात आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी साधना करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. वास्तविक, प्रत्येक जन्माष्टमी शुभ असते आणि श्रीकृष्ण भक्तांची सर्व दुःखे दूर करतात. परंतु जर तुम्ही विशिष्ट कालखंडात आणि नक्षत्रात भजन कीर्तनासोबत श्री कृष्ण कथा आणि लीला अमृतचे पठण केले तर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख, समृद्धी आणि यशाचा आशीर्वाद देतील.

शुभ वेळ आणि पद्धत

अष्टमी तिथी बुधवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. जन्माष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 11.44 ते 12.29 असा असेल. या शुभ मुहूर्तावर बाल गोपाळाची पूजा केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला सजवल्यानंतर अष्टगंध, चंदन, अक्षत आणि चंदनाचा टिळा लावून त्यांना माखन, मिश्री व इतर अन्नपदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी