जपानी व्यापारी भगवान शंकराच्या भक्तीत लीन, अब्जावधींची संपत्ती सोडून धारण केले भगवे वस्त्र

एक जपानी व्यापारी शंकराच्या भक्तील लीन झाला आहे. होशी ताकायुकी असे त्याचे नाव आहे. सुरुवातीच्या काळात त्याने सौंदर्य उद्योगात प्रसिद्धी मिळवली होती. मात्र आता तो बाल कुंभ गुरुमुनी बनला आहे.

जपानी व्यापारी भगवान शंकराच्या भक्तीत लीन, अब्जावधींची संपत्ती सोडून धारण केले भगवे वस्त्र
hoshi takayuki
| Updated on: Jul 28, 2025 | 6:27 PM

भगवान शंकराचे भक्त जगभरात आहेत. अशातच आता एक जपानी व्यापारी शंकराच्या भक्तील लीन झाला आहे. होशी ताकायुकी असे त्याचे नाव आहे. सुरुवातीच्या काळात त्याने सौंदर्य उद्योगात प्रसिद्धी मिळवली होती. मात्र आता तो बाल कुंभ गुरुमुनी बनला आहे. टोकियोमधील 15 लक्झरी ब्युटी स्टोअर्सचा मालक असलेला ताकायुकी आज हरिद्वारच्या रस्त्यांवर भगवे कपडे घालून, कावड यात्रेत सहभागी झालेले दिसले.

नाडी ज्योतिषामुळे जीवन बदल

होशी ताकायुकी हे दोन दशकांपूर्वी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते एका नाडी ज्योतिष केंद्रात गेले होते. त्यांची नाडी परिक्षण केल्यानंतर त्यांना तुम्ही एकेकाळी हिमालयातील तपस्वी ऋषी होते असे सांगण्यात आले. त्यामुळे ताकायुकी हे जपान सोडून भारतात आले.

घराचे शिवमंदिर बनवले

नाडी ज्योतिषाने दिलेल्या माहितीमुळे ताकायुकीच्या जीवनात मोठा बदल झाली. त्याने टोकियोमधील सर्व दुकाने नातेवाईकांकडे सोपवली आणि तो भारतात आला. तसेच त्याने त्याच्या जपानी घराचे शिवमंदिरात रूपांतर केले. आणखी एका नाडी ज्योतिषाने त्याचे आध्यात्मिक नाव बाला कुंभ गुरुमुनी असे असल्याचे सांगितले, त्यामुळे त्याने ते नाव धारण केले.

सध्या बाला कुंभ गुरुमुनी 20 जपानी अनुयायांसह भारतात आले. ते सध्या देहराडूनजवळील एका कॅम्पमध्ये राहत आहेत. ते कावड यात्रेकरुंची सेवा करत असून त्यांना मोफत जेवण देत आहेत. संपूर्ण भारतात शिवमंदिर बांधणे आणि आध्यात्मिक मुळे शोधणे हे गुरुमुनी यांचे ध्येय आहे. यासाठी त्यांनी पुडुचेरीमध्ये 35 एकर जमीन देखील खरेदी केली आहे, या ठिकाणी एक भव्य शिवमंदिर बांधले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

अलीकडेच गुरुमुनी हरिद्वारच्या कावड यात्रेच्या मार्गावर भगवी वस्त्रे घातलेल्या वेषात दिसले होते. त्यांना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. गुरुमुनींच्या उपस्थित असलेल्या हजारो भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या आतापर्यंतच्या त्यागातून ते सच्चे शिव भक्त असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच त्यांचे जपानी अनुयायी भारतात आले आहेत, त्यामुळे ते भारतासह जपानमध्येही शिवभक्तीचा प्रसार करत असल्याचे स्पष्ट होते.