AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला आहे विशेष महत्त्व, या चुका अवश्य टाळा

मुंबई : एकादशी महिन्यातून दोनदा येते. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसऱ्यांदा शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षातील एकादशी पौर्णिमेनंतर येते आणि शुक्ल पक्षातील एकादशी अमावस्येनंतर येते. शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. ही एकादशी शास्त्रात अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले आहे. एकादशीला भगवान विष्णूचे व्रत करतात. या दिवशी विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. जया एकादशीचे (Jaya Ekadashi) व्रत […]

Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला आहे विशेष महत्त्व, या चुका अवश्य टाळा
भगवान विष्णू Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 07, 2024 | 8:06 PM
Share

मुंबई : एकादशी महिन्यातून दोनदा येते. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसऱ्यांदा शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षातील एकादशी पौर्णिमेनंतर येते आणि शुक्ल पक्षातील एकादशी अमावस्येनंतर येते. शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. ही एकादशी शास्त्रात अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले आहे. एकादशीला भगवान विष्णूचे व्रत करतात. या दिवशी विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. जया एकादशीचे (Jaya Ekadashi) व्रत गृहस्थ आणि गृहस्थ नसलेले दोघेही करू शकतात. एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते.

जया एकादशी 2024 व्रताची शुभ वेळ, पराणची तारीख आणि वेळ

हिंदू कॅलेंडरनुसार, एकादशी तिथी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:49 वाजता सुरू होईल आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 09:55 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 20 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. जया एकादशी व्रताची पारण वेळ २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.५५ ते 9.11 अशी असेल.

जया एकादशी व्रताचे महत्त्व

जया एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी राहते. असे म्हणतात की या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि भय इत्यादीपासून मुक्ती मिळते.

एकादशीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका

  • एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये.
  • एकादशीच्या दिवशी मांस, मद्य आणि मादक पदार्थांपासून अंतर राखावे.
  • एकादशीच्या दिवशी कोणाशीही शिवीगाळ करू नका, भांडण करू नका.
  • एकादशी व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये.
  • एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे आणि तोडणे या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद