Karwa Chauth: असं एक गाव जिथे 200 वर्षापासून महिला करवा चौथच साजरा करत नाही, या गोष्टीची भीती? ऐकून घाम फुटेल
आज करवा चौथचा सण संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. खासकरून उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. कार्तिक कृष्ण चतुर्थीला विवाहित महिला सोळा अलंकार घालून पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. मात्र असे एक गाव आहे जिथे विवाहित महिला करवा चौथ हा सण साजरा करत नाही. यामागील कारण जाणून घेऊयात.

आज करवा चौथचा सण संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. खासकरून उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. कार्तिक कृष्ण चतुर्थीला विवाहित महिला सोळा अलंकार घालून पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. मात्र असे एक गाव आहे जिथे विवाहित महिला करवा चौथ हा सण साजरा करत नाही. यामागे एक दुःखद घटना असल्याचे मानले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील नौहझील परिसरातील रामनगला गावात महिला करवा चौथ हा सण साजरा करत नाहीत. यामागिल कारण असे आहे की, शेकडो वर्षांपूर्वी रमंगळा गावातील एक ब्राह्मण आपल्या नवविवाहित पत्नीला यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या गावातून घेऊन सुरीरला परतत होता. हा तरुण रेडा ओढत असलेल्या गाडीत बसलेला होता. त्यावेळी सुरीरमधील काही लोकांनी हा रेडा आपला असल्याचा दावा करत भांडण सुरु केले. या वादात रमंगळा येथील तरुणाचा मृत्यू झाला.
नवविवाहित महिलेच्या डोळ्यासमोर तिच्या पतीचा मृत्यू झाला, त्यामुळे ती दुःखी झाली. यानंतर तिने परिसरातील लोकांना शाप दिला. ती म्हणाली की, ‘जशी मी माझ्या पतीच्या मृतदेहासोबत सती जात आहे, तसेच तुमच्या परिसरातील कोणतीही महिला नटून थटून राहणार नाही, कोणतीही महिला सोळा अलंकार घालू शकणार नाही.’
विवाहित महिलांमध्ये सतीच्या शापाची भीती
या महिलेच्या शापाचा परिणाम आजही पहायला मिळत आहे. या घटनेनंतर आसपासच्या परिसरातील अनेक तरुणांचा मृत्यू झाला. अनेक महिला विधवा झाल्या. हा सतीच्या शापाचा परिणान आहे असं मानत वृद्धांनी क्षमा मागण्यासाठी तेथे एक मंदिर बांधले.
लोकांचे म्हणणे काय आहे?
याबाबत बोलताना सुनहरी देवी नावाच्या एका वृद्ध महिलेने सांगितले की, ‘सती मातेच्या पूजेमुळे अनैसर्गिक मृत्यू थांबले. मात्र विवाहित महिला आजही पतींच्या दीर्घायुष्यासाठी असणारे करवा चौथचे व्रत पाळत नाहीत. तसेच आमच्या भागात करवा चौथच्या दिवशी त्यांच्या मुलींना भेटवस्तू देण्याचीही प्रथा नाही.
200 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेपासून या भागातील विवाहित महिला करवा चौथच्या दिवशी शृंगार करत नाही, तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत नाहीत. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही पाळली जाते. कोणतीही विवाहित महिला ही परंपरा तोडण्यात तयार होत नाही. त्यामुळे या भागातील महिलांमध्ये या सतीच्या शापाबद्दल आजही भीती असल्याचे दिसून येत आहे.
