kaal bhairav jayanti 2021 | मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता हवी आहे, मग काल भैरवाची आराधना करा, जाणून घ्या विधी

काल भैरव हे भगवान शंकराचे एक रुद्र रुप आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमीचे व्रत केले जाते. काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते.

kaal bhairav jayanti 2021 | मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता हवी आहे, मग काल भैरवाची आराधना करा, जाणून घ्या विधी
Kaal-Bhairav-janyani
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 8:00 AM

मुंबई : काळ भैरव हे भगवान शंकराचे एक रुद्र रुप आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमीचे व्रत केले जाते. काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. कालभैरव जयंतीची पूजा केल्याने अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते, असे म्हणतात. या वर्षी शनिवार 27 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने तंत्र, मंत्र,नजर लागणे यांसारख्या गोष्टी नष्ट होतात, अशी मान्यता आहे. भैरव जयंतीच्या दिवशी पूजेमध्ये काल भैरव चालीसा पाठ कोल्याने आयुष्यातील बऱ्याच वाईट गोष्टी नष्ट होतात. जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठे आहेत, तिथे कालभैरवाला स्थान मिळाले आहे. काल भैरवाचे अस्तित्व वैष्णो देवी, उज्जैनचे महाकालेश्वर, विश्वनाथ मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते.

काळ भैरवाची कहाणी पुराणांमध्ये अशी मान्यता आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाले. तेव्हा, ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला. यामुळे, रागाने शिवाने रुद्र रूप धारण केले आणि काळ भैरव त्यांच्या याच रूपात जन्मला. काळ भैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले. यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्म हत्येचा आरोप झाला.  पापातून मुक्त होण्यासाठी शिवाने काल भैरव यांना प्रायश्चित्त करण्यास सांगितले. काळ भैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले. पण, काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. तेव्हापासून काशीमध्ये काळ भैरवची स्थापना झाली आणि शहराला कोतवाल म्हटले जाऊ लागले.

काळ भैरव जयंती पूजा शुभ मुहूर्त मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी तिथी शनिवार 27 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 5:43 वाजता सुरू होईल आणि रविवार, 28 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 6:00 वाजता समाप्त होईल.

अशी करा पुजा अष्टमीच्या दिवशी व्रत करावे. आंघोळानंतर स्वच्छ कपडे घालावून भगवान शंकरासमोर दिवा लावावा आणि पूजा करावी. या दिवशी भैरव मंत्राचा 1008 वेळा जप करावा.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

संबंधित बातम्या :

Friday Lakshmi Mantra | आयुष्य आर्थिक संकटांनी वेढलेलं आहे, देवी लक्ष्मीच्या या मंत्रांचा जप करा

येणाऱ्या नवीन वर्षात या 4 गोष्टी घरी आणा, घरामध्ये सुख समृद्धी नक्की नांदेल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.