AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी

पंचांगानुसार, एप्रिल 2026 मध्ये लग्नासाठी अनेक शुभ तारखा आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण एप्रिलमधील कोणते दिवस लग्नासाठी शुभ आहेत त्यांची यादी जाणून घेऊयात.

एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
Mangal
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 8:12 AM
Share

हिंदू पंचांगानुसार एप्रिल 2026 हा महिना विवाह आणि इतर शुभ कार्यक्रम करण्यासाठी विशेषतः शुभ असणार आहे. कारण या महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खरमासामुळे कोणतेही शुभ कार्य करता येत नाही. मात्र खरमास संपताच शुभ कार्य, लग्न सोहळा व इतर कार्य करण्यास उत्तम दिवस सुरू होत आहे. या वर्षी 15 एप्रिल 2026 पासून, विवाह, मुंडन आणि गृहप्रवेश यांसारखे शुभ प्रसंग पुन्हा सुरू होतील. जर तुम्हीही तुमच्या घरी लग्नाची तयारी करत असाल, तर एप्रिल महिन्यात अनेक उत्तम तारखा आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण एप्रिल 2026 मधील लग्नाच्या शुभ तारखांची संपूर्ण यादी जाणून घेऊयात.

एप्रिल 2026 मधील विवाहासाठी शुभ तारखा

15 एप्रिल, 2026 बुधवार

20 एप्रिल 2026 सोमवार

21 एप्रिल, 2026 मंगळवार

25 एप्रिल, 2026 शनिवार

26 एप्रिल, 2026 रविवार

27 एप्रिल, 2026 सोमवार

28 एप्रिल, 2026 मंगळवार

29 एप्रिल 2026 बुधवार

15 एप्रिलपासून शुभ कार्ये का सुरू होतात?

हिंदू पंचांगानुसार खरमासाच्या या महिन्यात सूर्य गुरूच्या राशीत म्हणजेच धनु किंवा मीन राशीत असतो, ज्यामुळे विवाहासारखे शुभ प्रसंग करणे निषिद्ध ठरतात. मात्र काही दिवसांनी म्हणजेच 14 एप्रिल 2026 मध्ये खरमास संपणार आहे. त्यानंतर सर्व शुभ प्रसंग 15 एप्रिलपासून सुरू होतील. या दिवसानंतर ग्रहांची स्थिती अनुकूल होणार आहे. ज्यामुळे विवाह आणि इतर शुभ प्रसंगा सोहळा साजरा करण्यासाठी प्रत्येक दिवस अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

अक्षय्य तृतीयेचे विशेष महत्त्व

अक्षय तृतीयेचा पवित्र सण देखील एप्रिल महिन्यात आहे. 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीय आहे. शास्त्रानुसार, अक्षय तृतीया हा एक शुभ काळ मानला जातो. कारण याचा अर्थ असा की, या दिवशी शुभ कार्य, गृहप्रवेश, विवाह व इतर मांगलिक कार्य पंचांग न पाहता संपन्न केले जाऊ शकतात. म्हणूनच एप्रिल महिन्यात सर्वाधिक विवाह सोहळा होत असतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल