AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kojagiri Purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेला केलेल्या या उपायांनी मिळेल सुखसमृद्धी आणि होईल धनप्राप्ती

उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी काही उपाय केल्याने वैवाहिक जीवनाशी आणि व्यवसायाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकते.

Kojagiri Purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेला केलेल्या या उपायांनी मिळेल सुखसमृद्धी आणि होईल धनप्राप्ती
कोजागिरी पौर्णिमा २०२२Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 08, 2022 | 3:13 PM
Share

मुंबई,  यावर्षी शरद पौर्णिमा 9 ऑक्टोबर, रविवारी म्हणजेच उद्या येत आहे. पौर्णिमा हे शरद ऋतूच्या आगमनाचे संकेत आहे. अश्विन महिन्यातील या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2022) असेही म्हणतात. शरद पौर्णिमेची रात्र विशेष असते. या रात्री चंद्राचा प्रकाश खूप महत्वाचा मानला जातो. असे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात असे काही घटक असतात, जे आपले शरीर आणि मन शुद्ध करतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. वास्तविक, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे चंद्राचा प्रकाश आणि त्यात असलेल्या घटकांचा पृथ्वीवर थेट आणि सकारात्मक परिणाम होतो.

जोतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाशी संबंधित घटक आहेत. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याचा आपल्या मनावर अधिक परिणाम होतो. जे मानसिकरित्या अस्वस्थ आहेत, जे डिप्रेशनमध्ये राहतात, ज्यांना सतत भय वाटते त्यांच्यासाठी शरद पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात काही विशेष उपाय केल्याने तुम्ही या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.

वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी उपाय

ज्यांच्या वैवाहिक जीवनात कटुता आली आहे त्यांनी या दिवशी काही उपाय केल्यास जोडीदारासोबतचे नटे सुधारण्यास मदत होऊ शकते. यासाठी चांदीची मोत्याची अंगठी  चंद्राच्या ‘ओम श्रम श्रीं श्रोण सह: चंद्रमसे नमः’  108 वेळा मंत्रजाप करून अभिमंत्रित करा.

अशा रीतीने मंत्राने अंगठीला उर्जा दिल्यानंतर ती एका वाडग्यात ठेवा आणि ती चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून उजव्या हाताच्या करंगळीत घाला. या उपायाने वैवाहिक जीवनातल्या बाधा दूर होतील.

व्यवसायात मिळेल यश

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित निर्णय घेता येत नसतील किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर  शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच त्यांच्यापुढे हात जोडून नतमस्तक व्हा आणि काही वेळ ध्यानाच्या मुद्रेत बसा. व्यवसायात यश मिळण्यासाठी आशीर्वाद मागा.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.