AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभमेळ्यात अंघोळीला आली अन् डुबकी घेण्यापूर्वीच ‘पाप’ गेलं चोरीला; लोक बघतच राहिले

प्रयागराजमधील कुंभमेळ्यात करोडो भाविकांनी सहभाग घेतला. पण, या पवित्र सोहळ्याच्या सावलीत लूटमार आणि चोरीचे प्रकारही घडत आहेत. भाविकांनी गंगेत सोडलेले पूजा साहित्य, नारळ, फळे आणि पैसे लुटण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही लोक हे साहित्य जमा करून विक्रीही करत आहेत.

कुंभमेळ्यात अंघोळीला आली अन् डुबकी घेण्यापूर्वीच 'पाप' गेलं चोरीला; लोक बघतच राहिले
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Feb 23, 2025 | 8:54 PM
Share

आता काही दिवसातच प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा समारोप होणार आहे. जगातील या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात करोडो लोकांनी आस्थेची डुबकी घेतली. देश-विदेशातील अनेक लोकांनी संगम येथे येऊन आपले पाप धुतले. हिंदू धर्मात पाप धुवायला अनेक मार्ग आहेत. काही लोक संगमच्या पवित्र पाण्यात डुबकी घेऊन पाप धुताना दिसले, तर काही लोक आपापल्या सामर्थ्यानुसार वस्तू पाण्यात प्रवाहित करताना दिसले.

तुम्ही संगमच्या पाण्यात नारळ, फुलं, धूपबत्ती आणि इतर पूजेचे साहित्य तरंगत असताना पाहिलं असेल. या पूजा साहित्याला पाण्यात सोडून लोक आपल्या पापाचं प्रायश्चित करत होते. पण पाण्यात तरंगणाऱ्या या पूजा साहित्यावर गिधाडा सारखी नजर ठेवून असलेलेही काही लोक होते. जेव्हा भाविक भक्तीभावाने पाण्यात हे साहित्य प्रवाहित करत होते, तेव्हा काही लोक हे साहित्य लुटण्यासाठी एकच झेप घेत होते. नारळ, पैसे आणि फळं खायला मिळावीत म्हणून लोकांच्या एकच झुंबड उडत होती. सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपल्याशी संबंधित अशी लूट होण्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हे पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

हातोहात सामान पळवलं

काही लोक तर पाण्यात सोडून दिलेलं हेच पूजेचं साहित्य मिळवून पुन्हा त्याची विक्री करतानाही दिसत होते. नारळ, दुपट्टा आणि खण पाण्यात सोडून दिले जात होते. तर काही लोक भाविकांनी सोडलेल्या या वस्तू पुन्हा जमा करून त्या दुकानात विकताना दिसत होते. काही ठिकाणी तर दुकानदारच स्वतःची मुलं आणि महिलांना या कामावर ठेवतानाही दिसले. सुरुवातीला हे लोक भक्तांकडून प्रवाहित केलेलं साहित्य जमा करत होते, पण महाकुंभाचा समापन जवळ आल्यावर आता लोकांच्या हातूनच सामान छीनले जात असल्याचंही दिसत आहे.

महिलेला धक्का बसला

अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एक महिलाही आपले पाप गंगेत सोडून देण्यासाठी आली होती. तिने एका ताटात पूजेचं सर्व साहित्य घेतलं होतं. नारळ होतं, फळे होती, चुनरी होती आणि इतर पूजा साहित्य होतं. ही महिला गंगेच्या पाण्यात गेली. उभी राहिली आणि जशी ती पूजा साहित्य पाण्यात सोडायला गेली, तसं त्या सामानावर लहान मुलांचं एक टोळकं तुटून पडलं. पूजाचं साहित्य पाण्यात सोडलंही नव्हतं तेच मुलांनी तिच्या हातावर हात मारला आणि संपूर्ण साहित्य हिसकावलं. हे पाहून महिला आश्चर्यचकित झाली आणि तिच्या चेहऱ्यावर हताशतेचे भाव स्पष्टपणे दिसून आले. पाप धुवायला आली आणि पापच चोरीला गेले, असेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव होते. असे अनेक प्रकार संगमच्या पाण्यात स्नान करत असलेल्या लोकांसोबत घडत आहेत, असं सांगितलं जातं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...