पितृदोष दूर करण्यासाठी एक रामबाण उपाय! लाल किताब आणि ज्योतिषशास्त्र सांगतं की…
मानवी जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा काही गोष्टी आपल्या आकलनाबाहेर जातात. त्यामुळे ज्योतिषांकडे काही उपाय आहे का पाहिलं जातं. पितृदोष असाच एक प्रकार असून त्यामुळे कामात अडचणी येतात. पितृदोष दूर करण्यासाठी लाल किताब आणि ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी उपाय दिले गेले आहेत.

अनेकदा काम होता होता राहून जातात. त्यामुळे नशिबाला दोष देण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्योतिषांकडे जाऊन काही विचारलं तर पितृदोष असल्याचं सांगितलं जातं. पितरं नाराज असली की पितृदोष लागतो. पितृदोष असला करी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे पीडित व्यक्तीला धडकी भरते. आता आयुष्यभर असंच राहावं लागतं की काय असा प्रश्न पडतो. कधी ज्योतिषाने सांगितलेल्या पूजा वगैरे महागड्या वाटतात. त्यामुळे काही तरी सोपा उपाय मिळालं तर बरं होईल अशी भावना असते. ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबमध्ये पितृदोषासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत. त्यापैकी एक सोपा आणि साधा उपाय कोणीही करू शकतं. लाल किताबमध्ये पितृदोष दूर करण्यासाठी काळ्या तिळाचा उपाय प्रभावी असल्याचं सांगितलं आहे. काळे तीळ पितृदोष दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. काळ्या तीळामुळे शनि दोष, राहु केतुचा दोषही दूर होतात. तुम्हालाही पितृदोषातून दिलासा हवा असेल तर पुढील उपाय करा.
पितृदोष असल्यास भगवान शिवाची पूजा केल्यास दिलासा मिळते. त्याचबरोबर शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे शिवलिंगाची पूजा करताना काळे तीळ अवश्य अर्पण करा. पितळेच्या कलशात पाणी घ्या. त्यात थोडे काळे तीळ टाका आणि त्याने शिवलिंगावर अभिषेक करा. रोज असं केल्याने पितृदोष शांत होतो.
तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाका आणि दक्षिण दिशेला अर्घ्य द्या. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. या दिशेला पितरांचा वास असतो. त्यामुळे पाण्यात काळे तीळ मिश्रित करून दक्षिण दिशेला अर्घ्य द्या. यामुळे पितरं प्रसन्न होतील.
पितृदोष दूर करण्यासाठी रोज पाण्यात काळे तीळ टाकून पिंपळाला द्या. तसेच पिंपळाच्या वृक्षाखाली तिळाचा दिवा लावा. तसंच वारंवार वाईट घडामोडी घडत असतील तर मुठभर काळे तीळ घेऊन कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवून घ्या आणि उत्तर दिशेला फेका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
