Somvati Amavasya 2022: वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या, जाणून घ्या महत्व,’या’ गोष्टी टाळाच

30 मे रोजी सोमवती अमावस्या आली आहे. ही अमवस्या 2022 ची शेवटची अमावस्या असल्याने या दिवशी व्रत आणि पुजेचे अधिक महत्त्व आहे.जाणून घ्या महत्त्व आणि टाळा 'या' चुका.

Somvati Amavasya 2022: वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या, जाणून घ्या महत्व,'या' गोष्टी टाळाच
सोमवती अमावस्या
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 5:19 PM

Somvati Amavasya 2022: 2022 ची शेवटची सोमवती अमवास्य (Somvati Amavasya ) लवकरच येणार आहे. हिंदु पंचांगानुसार (Hindu Panchang) ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच 30 मे रोजी सोमवती अमावस्या आली आहे. ही अमवस्या 2022 ची शेवटची अमावस्या असल्याने या दिवशी व्रत आणि पुजेचे अधिक महत्त्व आहे या दिवशी भगवान शंकर, (Lord Shiva) माता पार्वती (Parvati) आणि पिंपळाच्या झाडाची पुजा केली जाते. सोमवती अमावस्या आणि वटपौर्णिम एकाच दिवशी आली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि वटवृक्षाची पुजा करता. जाणून घेऊया सोमवती अमावस्येच्या दिवशी काय गोष्टी टाळल्या पाहिजेत तसेच या दिवसाचे महत्त्वही जाणून घेऊया.

सोमवती अमावस्येला टाळा या गोष्टी

  • सोमवती अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणे चुकीचे आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि पुजा करावी. धार्मिक नियमांनुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी स्मशानात जाणे टाळावे.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी मांसाहार टाळावा. या दिवशी मद्य प्राशन करू नये तसेच केस आणि नखंही कापू नयेत.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाडाचे महत्त्व आहे. या दिवशी लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. परंतु या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करत नाहीत. या झाडात देवी देवतांचा वास असतो.
  • धार्मिक नियमांनुसार या दिवशी कुणालाही दुखवू नये, कुणालाही वाईट साईट बोलू नये. या दिवशी ज्येष्ठांचा आशिर्वाद घ्यावा असे केल्यास आपलं भाग्य उजळतं.

सोमवती अमावस्येचे महत्त्व

सोमवती अमावस्येबद्दल अनेक अख्यायिक आहेत. परंतु शास्त्रांनुसार या दिवशी जे लोक उपवास करतात आणि पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. तसेच आयुष्यात सुखर समृद्धी येते. या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचा प्रघात आहे. या दिवशी ब्रह्म मुहुर्ताला उठून गंगेत स्नान केल्यास पुण्य मिळतं. सोमवती अमावस्येच्या दिवशी दान करणे अपेक्षित आहे. असे म्हटले जाते या दिवशी जे लोक दान करतात देव दुप्पट दान त्यांच्या पदरात टाकतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेची पुज केल्यास आर्थिक संकट दूर होतात.

हे सुद्धा वाचा

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.