काय सांगता! रहस्यमयी शिव मंदिर, 12 वर्षातून वीज दर्शनाला येते, शिवलिंगाचे होतात तुकडे तुकडे, मग काय होते पुढे?
Lighting Falls on Shiv Temple : या रहस्यमयी शिव मंदिराची जगभर चर्चा आहे. कारण या शिव मंदिरावर 12 वर्षांतून एकदा वीज पडते. त्यावेळी शिवलिंगाचे तुकडे तुकडे होतात. पण मग पुढे काय होते? काय आहे ती रहस्यमयी कथा, जाणून घ्या.

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील वीज महादेव मंदिर-बिजली महादेव मंदिर एक अनोखे मंदिर आहे. येथे दर 12 वर्षांनी वीज कोसळते. ही घटना स्थानिक लोकांसाठीच नाही तर जगभरातील लोकांसाठी एक आश्चर्याचा धक्का आहे. त्यांच्या आस्थेचे, श्रद्धेचे केंद्र आहे. हे महादेव मंदिर शांततेसाठी आणि नैसर्गिक सुंदरतेसाठी पण प्रसिद्ध आहे. हे शिवलिंग समुद्र सपाटीपासून 2460 मीटर उंचीवर आहे. या मंदिराशी जोडलेली अनेक रहस्यमयी कथा आणि मान्यता यामुळे त्याविषयीचे गूढ अजून वाढते.
काय आहे मंदिराचा इतिहास
हिमाचल राज्यातील कुल्लू डोंगररांगामध्ये एक मोठा राक्षस कुलंत राहत होता. भगवान शंकराने या राक्षसाला ठार केले आणि त्याचा शरीराला एका पर्वतात बदलले. याच पर्वतावर हे बिजली महादेव मंदिर आहे. भगवान शिवाने इंद्राला आदेश दिला होता, दर 12 वर्षांनी ते या ठिकाणी वीज पाडतील, अशी मान्यता आहे. त्यामुळे 12 वर्षात एकदा येथे वीज पडून शिवलिंग तुटते.




मग पुढे काय होते?
या मंदिरातील शिवलिंगावर वीज कोसळते. 12 वर्षांतून एकदा ही घटना घडते. वीज कोसळल्यानंतर शिवलिंग तुटते. त्यानंतर भाविक आणि पुजारी मिळून हे शिवलिंग पुन्हा लोण्याने जोडतात. त्यावर लोण्याचा जाड थर लावण्यात येतो. त्याची पुजा करण्यात येते. हे मंदिर खाहल पर्वतरांगेच्या एका उंच डोंगरावर आहे. या मंदिरात देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक जण दर्शनासाठी आणि चमत्कार समजून घेण्यासाठी येतात.
वीज पडण्यामागील विज्ञान पण समजून घ्या
काही वैज्ञानिकांच्या मते, हे स्थान उंच डोंगरावर आहे. भौगोलिक स्थितीमुळे याच ठिकाणी ही वीज पडत असेल. कारण या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि आर्द्रता अधिक असते. त्यामुळे वीज पडण्यासाठी अनेक गोष्टी अनुकूल ठरतात. पण शिवलिंगावरच कशी वीज पडते, यावर अजून संशोधन सुरू आहे. त्याविषयीची माहिती समोर आलेली नाही. अर्थात दर 12 वर्षांनी वीज पडून शिवलिंग कसे तुटते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कोणी त्याला चमत्कार म्हणते. तर कोणी हा उत्सुकतेचा विषय मानतो.
डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी त्याला कुठलाही प्रकारचा दुजोरा देत नाही.