AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : आम्ही घरात घुसून मारू आणि एक… मोदींचा पाकला थेट इशारा

PM Narendra Modi Warn to Pakistan : पंजाबमधील आदमपूर एअरबेसवरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. पाकिस्तानच बुरखा टराटरा फाडला. त्याचवेळी त्यांनी पुन्हा पहलगामसारखी आगळीक केली तर सोडणार नाही, असा थेट इशारा दिला.

PM Narendra Modi : आम्ही घरात घुसून मारू आणि एक... मोदींचा पाकला थेट इशारा
करारा जबाब मिलेगाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 13, 2025 | 4:07 PM
Share

पंजाबमधील आदमपूर एअरबेसवरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. त्यांनी पाकिस्तानची दहशतवादाचा बुरखा टराटरा फाडला. त्यांनी पुन्हा पहलगाम सारखी आगळीक केली तर घरात घुसून मारू आणि एक संधीही देणार नाही असा सज्जड इशारा दिला. हा नवीन भारत आहे. मानवतेवर हल्ला झाला तर दहशतवाद्यांना मातीत गाडणे त्याला माहिती आहे हे सांगायला मोदी विसरले नाहीत. दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला भारत आपल्या अटी आणि शर्तीवर त्याला प्रत्त्युतर देईल. पाक लष्कर आणि दहशतवादी यांना वेगळे मानणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला.

आम्ही घरात घुसून मारू

पाकिस्तानमधील असा कोणता ठिकाणा नाही की जिथे बसून दहशतवादी आरामात राहू शकेल. आम्ही घरात घुसून मारू. आणि वाचण्याची एक संधीही देणार नाही. आमचे ड्रोन्स, आमची मिसाईल त्याच्या विषयी विचार करून पाकिस्तानला अनेक दिवस झोप येणार नाही, असे खणखणीत उत्तर त्यांनी पाकिस्तानच्या कुरापतींना दिले.

कौशल दिखलाया चालो में, उड गया भयानक भालो में, निर्भिड गया वो ढालो में, सरपट डोला करवालो में… हे वाक्य महाराणा प्रतापाचं प्रसिद्ध घोडा चेतकसाठी लिहिली. पण हे काव्य आजच्या आधुनिक हत्यारांनाही फिट बसते. ऑपरेशन सिंदूरने तुम्ही आत्मबल वाढवलं. देशाला एकतेच्या सूत्रात बांधलं आहे. तुम्ही भारताच्या सीमेचं संरक्षण केलं आहे. भारताच्या स्वाभिमानाला नव्या उंचीवर आणलं आहे. तुम्ही जे केलं, जे अभूतपूर्व आहे. अकल्पनीय आहे. अद्भूत आहे. आमच्या एअरफोर्सने पाकिस्तानमध्ये इतक्या डीप पाकिस्तानच्या अड्ड्यांना टार्गेट केलं. सीमेपालिकडे पीन पॉइंटेड टार्गेट फिक्स केलं. हे फक्त प्रोफेशनल फौजच करू शकते. तुमची स्पीड अत्यंत वेगात होती की दुश्मन पाहातच राहिला. त्याला कळलंच नाही, त्याच्या छातीच्या कधी चिंधड्या उडाल्या, असे कौतुक त्यांनी भारतीय सैनिकांचे केले.

त्या षडयंत्रावर काय म्हणाले मोदी

पाकिस्तानच्या आत टेरर हेड क्वॉर्टरला हिट करायचं होतं. दहशतवाद्यांना हिट करण्याचं टार्गेट होतं. पण पाकिस्तानने आपल्या प्रवासी विमानांना समोर ठेवू जे षडयंत्र रचलं… तो क्षण किती कठिण होता… मला अभिमान आहे की तुम्ही सावधानतेने, सतर्कतेने सिव्हिलिएन एअर क्राफ्टला नुकसान न करता उत्तर दिलं. कमाल करून दाखवली, असे पाकिस्तानच्या षडयंत्रावर मोदी यांनी उत्तर दिले. पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला.

भारत जबाब देगा और पक्का जबाब देगा

मी अभिमानाने सांगू शकतो तुम्ही सर्वांनी तुम्ही तुमचं टार्गेट साधलं. पाकिस्तानात अतिरेकी ठिकाणे आणि त्यांचे एअरबेसच बरबाद झाले नाही तर त्यांचे नापाक इरादे आणि दुस्साहस या दोघांचा पराभव झाला आहे. ऑपरेशन सिंदूरने चवताळलेल्या शत्रूने आपल्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वारंवार आपल्याला टार्गेट केला. पण पाकचे नापाक इरादे प्रत्येकवेळी नाकाम झाले, असे सांगतानाच भारत जबाब देगा और पक्का जबाब देगा हे सांगायला मोदी विसरले नाहीत.

पाकिस्तानचे ड्रोन, त्यांचे यूएव्ही, पाकिस्तानचे एअरक्राफ्ट, त्यांचे मिसाईल आमच्या सशक्त तंत्रज्ञानापुढे फेल गेले. तुम्ही खूप चांगलं काम केलं. दहशतवादा विरूद्ध भारताची लक्ष्मण रेषा स्पष्ट आहे. आता टेरर अटॅक झाला तर भारत उत्तर देईल आणि पक्कं उत्तर देईल. आपण सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक द्वारे पाहिलं आहे. आता ऑपरेशन सिंदूर भारताचं न्यू नॉर्मल आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.