Operation Sindoor : पाकड्यांचे कंबरडे मोडले, 11 जवान ठार, तर अनेक जण…पहिल्यांदाच दिली मोठी कबुली
Pakistan Confession : ऑपरेशन सिंदूरची पाकने धास्ती घेतली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. आता या कारवाईनंतर पाकिस्तान हळूहळू कबुली जबाब देत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक हवाई दलाचे 5 तर लष्कराचे 6 जवान ठार झाले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने 6-7 मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसत भारताने 9 दहशतवादी तळ नष्ट केले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारल्या गेले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर 7 ते 10 मे रोजी ड्रोन आणि मिसाईलने अनेकदा हल्ले केले. त्याला दमदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने केलेल्या कारवाईत 11 एयरबेस उद्ध्वस्त केले. आता पाकिस्तानने त्याला झालेल्या नुकसानीची माहिती समोर आणली आहे. भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सेनेचे 11 जवान ठार झाले. तर 78 जवान जखमी झाले. यामध्ये 5 हवाई अधिकार्यांचा समावेश आहे.
हे अधिकारी कारवाईत ठार
पाकिस्तानने भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे टॉपचे अधिकारी ठार झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्तानी लष्कराचे अब्दुल रहमान, दिलावर खान, इकरामुल्ला, ख़ालिद, मुहम्मद अदील अकबर, आणि निसार मारल्या गेले. तर पाकिस्तानी हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, नजीब, कॉर्पोरल टेक्नेशियन फारूक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ मुबाशिर हे ठार झाले.
पाकिस्तानचे स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ यांच्यासह पाकिस्तानी हवाई दलाचे एकूण 5 हवाई दलाचे सैनिक मारल्या गेले. ते सर्व सिंध प्रांतातील जकोकाबाद एअरबेसवर तैनात होते. उस्मान आणि त्याचे साथीदार हे जेएफ-17 लढावू विमानाच्या सहाय्याने भारताविरोधात कारवाईची तयारी करत होते. तेव्हाच भारताने शहबाज ए्अरबेसवर हल्ला चढवला.
10 मे रोजी भारत-पाकिस्तानात युद्ध विराम
सलग तीन दिवसांच्या कारवाईनंतर पाकिस्ताने युद्ध विरामासाठी जगातील अनेक देशांकडे मदतीची याचना केली. पाकच्या डीएमओने भारताच्या डीएमओला फोन केला. दोन्ही देशांनी पाकिस्तान युद्ध विरामाला सहमती दर्शवली. अर्थात यानंतर ही पाकिस्तानची वाकडी शेपूट पुढे आली. तीन तासानंतर युद्ध विरामाचे उल्लंघन करण्यात आले. भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. जर युद्ध विरामाला अजून काही तास उशीर झाला असता तर कराची बंदर कचऱ्याच्या ढीगात रुपांतरीत झाले असते. भारताने केलेल्या कारवाईचे सर्व पुरावे सादर केले. त्यामुळे जागतिक मंचावर पाकची चांगलीच नाचक्की झाली.
