सोमवारी उपवास करणाऱ्यांवर भगवान शंकर होतात प्रसन्न; जाणून घ्या श्रावणातील सणांचे महत्त्व

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिव व्रत ठेवले जाते. या महिन्यात शिवपूजनासाठी एक विशेष नियम आहे. काही भक्त शिवभक्ताची पूजा करतात आणि संपूर्ण महिना उपवास करतात. श्रावण महिन्यात बहुतेक लोक सोमवारीच उपवास करतात.

सोमवारी उपवास करणाऱ्यांवर भगवान शंकर होतात प्रसन्न; जाणून घ्या श्रावणातील सणांचे महत्त्व
श्रावण महिन्यात सुवासिनींनी या 6 गोष्टी कराव्यात; अखंड सौभाग्यप्राप्ती होते !

मुंबई : श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणारा वर्षातील पाचवा महिना, तर इंग्रजी कॅलेंडरनुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात येणारा महिना. यावर्षी हा महिना 25 जुलैपासून सुरू होईल आणि 22 ऑगस्ट 2021 रोजी संपेल. याला ‘वर्षा ऋतू’ असेही म्हणतात. कारण या काळात भरपूर पाऊस पडतो. या महिन्यात अनेक महत्वाचे सण साजरे केले जातात, यामध्ये हरियाली तीज, रक्षाबंधन, नागपंचमी इत्यादी प्रमुख सणांचा समावेश आहे. ‘श्रावण’ महिन्यात भगवान शिवशंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या सोमवारांना ‘श्रावण सोमवार’ असे म्हणतात, ज्यामध्ये स्त्रिया आणि विशेषत: अविवाहित मुली भगवान शिव शंकरासाठी उपवास ठेवतात. (Lord Shankara is pleased with those who fast on Monday; know the importance of festivals in Shravan)

श्रावण सोमवारचे महत्व

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिव व्रत ठेवले जाते. या महिन्यात शिवपूजनासाठी एक विशेष नियम आहे. काही भक्त शिवभक्ताची पूजा करतात आणि संपूर्ण महिना उपवास करतात. श्रावण महिन्यात बहुतेक लोक सोमवारीच उपवास करतात. श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवातील व्रत, पूजा आणि शिव आरती यांचे विशेष महत्त्व आहे. शिवातील हे व्रत शुभ व फलदायी असतात. हे व्रत पाळणाऱ्या सर्व भक्तांना भगवान शिव प्रसन्न होतात, असे मानले जाते. हा उपवास भगवान शिव यांच्या प्रसन्नतेसाठी केला जातो. भगवान शिव शंकराची पूजा केल्यानंतर दिवसभरात एकाचवेळी अन्न खाल्ले जाते. उपवासात भगवान शिव व माता पार्वतीची पूजा करताना ‘शिवपंचक्ष मंत्र’चा जप केला जातो.

कावड यात्रा

असे मानले जाते की भारतातील पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक केल्याने भगवान शिव शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. ‘कावड’ हा संस्कृत भाषेतील शब्द ‘कांवांरथी’ पासून आला आहे. हा एक बहंगीचा प्रकार आहे, जो बांबूच्या काड्यापासून बनविला जातो. ‘कावड’ त्यावेळी बनविला जातो, ज्यावेळी गंगाजलचे भांडे दोन्ही बाजूंनी वैदिक विधीने फुले, हार, घंटा आणि घुंगरूंनी सजवले जातात. उदबत्तीचा सुगंध, तोंडात ‘बोल बम’चा जयघोष, मनामध्ये ‘बाबा एक सहारा’. असे म्हटले जाते की, पूर्वी ‘कांवरिडा’ रावण होता. भगवान श्रीराम यांनीही भगवान शिव शंकरांना कावड अर्पण केली होती.

हरियाली तीज

श्रावण महिना हा प्रेम आणि उत्साहाचा महिना मानला जातो. या महिन्यात नववधू त्यांच्या माहेरी जातात आणि झोका घेतात. याचवेळी नववधू तिच्या मैत्रीणींना आपल्या पतीबद्दल व दोघांमधील प्रेमाबद्दल सांगू लागते. प्रेमाचा धागा बळकट करण्यासाठी या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. यातील एक उत्सव म्हणजे ‘हरियाली तीज’. हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या पर्वणीबद्दल असे मानले जाते की माता पार्वतीने भगवान शिव यांना मिळवण्यासाठी तपस्या केली होती. माता पार्वतीच्या तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन भोलेनाथ यांनी ‘हरियाली तीज’च्या दिवशी आई पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले.

अविवाहित मुलींना हा उपवास केल्यामुळे त्यांच्या इच्छेला अनुरूप असा जीवनसाथी मिळतो. हरियाली तीजमध्ये हिरव्या बांगड्या, हिरव्या रंगाचे कपडे आणि मेंदीला विशेष महत्त्व आहे. मेहंदी हनीमूनचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच महिला हनीमूनमध्ये निश्चितपणे मेंदी लावतात. त्याचा थंड प्रभाव प्रेम आणि उत्साह संतुलित करण्यासाठीदेखील कार्य करतो. असेही मानले जाते की मेहंदी दुष्ट आत्म्यांना नियंत्रित करते. हरियाली तीजचा नियम असा आहे की आपल्या मनात राग येऊ देऊ नका. याबाबतीत मेंहदीचे औषधी गुणधर्म महिलांना उपयुक्त ठरतात.

पावसाळा

श्रावण महिन्यात जास्तीत जास्त पाऊस पडतो, ज्यामुळे शिव शंकरांचे गरम शरीर थंड होते. भगवान शंकरांनी स्वत: श्रावण महिन्याचा महिमा सनतकुमारांना सांगितला आहे. माझ्या तीन डोळ्यांमध्ये सूर्य उजवा, डावा चंद्र आणि अग्नि मध्य डोळा आहे, असे भगवान शंकर म्हणाले होते. जेव्हा सूर्य कर्क राशीत संक्रमण करतो, तेव्हा श्रावण महिना सुरू होतो. सूर्य उष्ण आहे, जो उष्णता देतो तसेच चंद्र थंड आहे, जो थंडपणा प्रदान करतो. म्हणूनच जेव्हा सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी मुसळधार पाऊस पडतो. जनतेच्या हितासाठी विष पिणारे भोलेनाथ यांना या पावसापासूनच शीतलता आणि विश्रांती मिळते. (Lord Shankara is pleased with those who fast on Monday; know the importance of festivals in Shravan)

इतर बातम्या

कोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत

ओबीसींनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा : छगन भुजबळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI