AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakshabandhan 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण, बहिणीने भावाला राखी कधी बांधावी, शुभ मुहूर्त काय?

पंचांगानुसार बहिणीने भावाला राखी बांधायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल. हा शुभ मुहूर्त नंतर सकाळी 9 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल.

Rakshabandhan 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण, बहिणीने भावाला राखी कधी बांधावी, शुभ मुहूर्त काय?
raksha bandhan and lunar eclipseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2026 | 4:42 PM
Share

रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस बाकी आहेत. या वर्षी 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. परंतु याच रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र ग्रहण असणार आहे. म्हणूनच या वर्षाचे रक्षाबंधन अगदी विशेष ठरणार आहे. चंद्रग्रहण असल्याने बहिणींनी आपल्या भावाला राखी कधी बांधायची? सुतक काळ पाळायचा की नाही? तसेच नेमके कोणते नियम पाळावेत? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण

चंद्रग्रहणाच्या दिवशीच रक्षाबंधन ही एक खूपच अभूतपूर्व अशी घटना आहे. यंदाचे म्हणजेच 2026 सालचे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल. त्यानंतर हे चंद्रग्रहण 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. एकूण 5 तास 35 मिनिटे हे चंद्रग्रहण असेल.

भारतात चंद्रग्रहण दिसेल का?

येत्या 28 ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण असेल. परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार का? असे विचारले जात आहे. या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. भारतातील कोणत्याच भागातून हे चंद्रग्रहण दिसणार नाही. धर्मशास्त्रानुसार जे चंद्रग्रहण डोळ्यांना दिसत नाही, त्याचा दृश्य प्रभाव त्या भागावर नसतो. त्यामुळेच ज्या भागात चंद्रग्रहण दिसत नाही तिथे कोणतेही धार्मिक नियम लागू होत नाहीत. भारतात चंद्रग्रहण दिसणार नसल्याने देशात कुठेही चंद्रग्रहणाचे धार्मिक नियम लागू नसतील.

शुभ मुहूर्तावर काय परिणाम पडणार?

भारतात चंद्रग्रहण न दिसणे ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे भारतात कोणतेही धार्मिक नियम पाळावे लागणार नाहीत. बहिणी आपल्या भावाला मुहूर्तावर राखी बांधू शकतात. चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर कोणताही परिणाम पडणार नाही. सोबतच सुतक काळ पाळण्याचीही गरज नसेल.

रक्षाबंधनाचा शुभ मूहर्त कोणता?

दरम्यान, पंचांगानुसार बहिणीने भावाला राखी बांधायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल. हा शुभ मुहूर्त नंतर सकाळी 9 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच राखी बांधण्यासाठी एकूण 3 तास 37 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल.

Follow Us
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा