Gupt Navratri 2025: माघ गुप्त नवरात्र कधी सुरू होईल? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Magh Gupt Navratri 2025: माघ गुप्त नवरात्री 2025 कधी आहे: माघ महिन्याची गुप्त नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. गुप्त नवरात्रीमध्ये भक्त पूर्ण भक्तिभावाने दुर्गा देवीची पूजा करतात. माघ महिन्यातील गुप्त नवरात्र कधी सुरू होईल आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे चला जाणून घेऊया.

हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जातो. नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा पाळले जाते. या चार नवरात्री व्रतांपैकी दोन गुप्त नवरात्री येते. प्रतिक्षा नवरात्रीमध्ये दुर्गा माताच्या नवरूपांची पूजा केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्यांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये मनापासून देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. नवरात्रीमध्ये अनेकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते. घरात घटस्थापना केल्यामुळे वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते. गुप्त नवरात्री तंत्रविद्येवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी अत्यंत खास मानली जाते.
हिंदू कॅलेंडरनुसार, यंदाची गुप्त नवरात्र माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी म्हणजेच 29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6.05 वाजल्यापासून ते 30 जानेवारी 2025च्या संध्याकाळी 4.10 पर्यंत असणार आहे. गुरुवार 30 जानेवारीपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होणार आहे. गुप्त नवरात्रीची समाप्ती शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.
गुप्त नवरात्रीची पूजा करण्यासाठी घरामध्ये घटस्थापना केली जाते. पंचांगानुसार गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 30 जानेवारी सकाळी 9.25 ते 10.46 पर्यंत आहे. अशा परिस्थितीमध्ये भाविकांना घटस्थापनेसाठी एकूण 1 तास 21 मिनिटे वेळ मिळणार आहे. याशिवाय घटस्थापनेचा मुहूर्त दुपारी 12.13 ते 12.56 पर्यंत असेल. घटस्थापनेसाठी भविकांना 43 मिनिटे मिळणार आहे. गुप्त नवरात्रीच्या काळात लसूण, कांदा, मांस, मद्य असे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. गुप्त नवरात्रीमध्ये पती-पत्नीने ब्रह्मचर्याचे पाळन करावे. गुप्त नवरात्री दरम्यान वाईट विचार मनात येऊ देऊ नका. गुप्त नवरात्रीसाठी ज्या लोकांनी उपवास केला आहे त्यांनी जास्त वेळ झोपू नये आणि केस आणि नखे कापू नयेत. अशाप्रकारे नियमानुसार पूजा केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.
गुप्त नवरात्रीमध्ये ‘या’ मंत्रांचे जप करा :
1) ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
2) या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
3) या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)