AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारीला की 12 तारखेला ? एका क्लीकवर गोंधळ करा दूर

माघ महिन्याच्या पौर्णिमेला विश्वाचे रक्षक भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास करणे आणि अनुष्ठान केल्याने जीवनात आनंद मिळतो. यंदा माघ पौर्णिमेच्या तिथीबाबत अनेकांचा गोंधळ आहे. चला तर मग जाणून घेऊया माघ पौर्णिमा कोणत्या दिवशी केले जाईल आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे.

माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारीला की 12 तारखेला ? एका क्लीकवर गोंधळ करा दूर
माघ पौर्णिमाImage Credit source: google
| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 6:00 PM
Share

हिंदू धर्मात माघ महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे. मान्यतेनुसार माघ महिन्यातील प्रत्येक दिवस दानासाठी विशेष मानला जातो. कारण माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील खूप फलदायी मानले जाते. असे केल्याने जीवनात सर्व पापांपासून मुक्तता मिळते व सुख समृद्धी येते. जाणून घ्या फेब्रुवारीमध्ये माघ पौर्णिमा नेमकी कधी आहे?

माघ पौर्णिमा 2025 कधी आहे?

हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याची पौर्णिमा मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल. बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार यंदा माघी पौर्णिमेचे व्रत 12 फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.

माघ पौर्णिमा पूजा विधी

माघ पौर्णिमेचा उपवास करण्यासाठी आणि माघ पौर्णिमेची पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर पूजेला सुरुवात करावी.एका स्वच्छ पाटावर लाल कापड ठेऊन त्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्यानंतर फुलांचा हार अर्पण करून सोळा शृंगार लक्ष्मी देवीला अर्पण करा. तुपाचा दिवा लावून आरती करून भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा आणि विष्णू चालीसा वाचा. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार फळे, मिठाई आणि इतर पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करा. पुजेच्या शेवटी जीवनात सुख-शांती लाभो अशी प्रार्थना करा आणि कुटुंबामध्ये प्रसादाचे वाटप करा.

माघ पौर्णिमा श्री विष्णु रूपम मंत्र

माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करा.

शान्ताकारम् भुजगशयनम् पद्मनाभम् सुरेशम् विश्वाधारम् गगनसदृशम् मेघवर्णम् शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तम् कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुम् भवभयहरम् सर्वलोकैकनाथम्॥

ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि। ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...