AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्री 26 की 27 फेब्रुवारीला? जाणून कधी कराल उपवास आणि दूर करा कन्फ्यूजन!

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. मात्र यावर्षी महाशिवरात्रीच्या तिथीवरून संभ्रम आहे. तुम्हीही अशाच संभ्रमात असाल तर ही बातमी वाचताच तुम्हाला उत्तर मिळेल. चला जाणून घ्या महाशिवरात्रीची तिथी आणि शुभ मुहूर्त

महाशिवरात्री 26 की 27 फेब्रुवारीला? जाणून कधी कराल उपवास आणि दूर करा कन्फ्यूजन!
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 12:09 PM
Share

शिवभक्त मोठ्या आतुरतेने महाशिवरात्रीची वाट पाहात असतात. आराध्य दैवत महादेवांचा व्रत करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शिव शंकर आणि माता पर्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक करणं शुभ मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला रुद्राभिषेक देखील विशेष फलदायी मानला जातो.त्याचे फळ हजारो पटीने मिळते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. धार्मिक मान्यतेनुसार, महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने संकटांचा अंत होतो. तसेच जीवनात सुख समृद्धी येते. हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीची तिथी बुधवारी 26 फेब्रुवारीला 11 वाजून 8 मिनिटांनी सुरु होईल. तसेच या तिथीचं समाप्ती 27 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी होईल. त्यामुळे 27 फेब्रुवारीला सकाळी अमावास्य सुरु होते. त्यामुळे 26 फेब्रुवारीलाच महाशिवरात्री साजरी केली जाईल. उदयतिथीनुसार 26 फेब्रुवारी रोजी उपवास आणि पूजा केली जाईल.

26 तारखेला रात्रीचे 12 वाजल्यानंतर रात्रीची पूजा केली जाईल. महाशिवरात्रीत रात्रीच्या वेळी पूजेचं महत्त्व आहे. या दिवशी निशा काळी 26 फेब्रुवारीला 12 वाजून गेल्यानंतर 27 फेब्रुवारीला रात्री 12 वाजून 9 मिनिटांपासून 12 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल. भगवान शिवांची पूजा करण्यासाठी 50 मिनिटे मिळतील. तंत्र, मंत्र आणि सिद्धीच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत शुभ मानला जातो.

चौथ्या प्रहरातील पूजेसाठी शुभ मुहूर्त

  • रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ – संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटं ते रात्री 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत असेल.
  • रात्रीच्या दुसऱ्या प्रहर पूजेची वेळ : 26 फेब्रुवारी रात्री 9 वाजून 26 मिनिटं ते 27 फेब्रुवारी 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल.
  • रात्रीचा तिसरा प्रहर पूजेची वेळ – 27 फेब्रुवारी रात्री 12 वाजून 34 मिनिटांपासून ते पहाटे 3 वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल.
  • रात्रीच्या चौथ्या प्रहर पूजाची वेळ – 27 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजून 41 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल.

महाशिवरात्रीचा व्रत पारण शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 53 मिनिटांपर्यंत असेल. यावेळी महाशिवरात्रीचा उपवास सोडू शकतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी