AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दिवशी सुरू होणार मार्गशीर्ष महिना, स्नान, दान अन् दिवे लावण्याचे जाणून घ्या खास महत्त्व

कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. या पवित्र महिन्यात स्नान, दान, दिवे लावणे आणि उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असे शास्त्रांमध्ये नमूद केले आहे. चला मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे आणि या महिन्यात कोणते कार्य करावे हे जाणून घेऊयात...

'या' दिवशी सुरू होणार मार्गशीर्ष महिना, स्नान, दान अन् दिवे लावण्याचे जाणून घ्या खास महत्त्व
मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 02, 2025 | 2:57 PM
Share

मराठी दिनदर्शिकेतील मार्गशीर्ष हा नववा महिना. आपल्या हिंदू धर्मात या पवित्र महिन्याला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या महिन्यात स्नान करणे, दान करणे आणि दिवे लावणे यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळते. तसेच या महिन्यात केले जाणारे कार्य अत्यंत फलदायी असते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते. तसेच या महिन्यात भगवद्गीतेचे पठण करावे. तर हा मार्गशीर्ष महिना कोणत्या दिवशी सुरू होईल तसेच या दिवसांमध्ये काय करावे याबद्दल जाणून घेऊयात…

2025 मध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरू होईल?

कॅलेंडरनुसार, या वर्षी मार्गशीर्ष महिना गुरुवार 6 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होत आहे. हा पवित्र महिना कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो आणि 4 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेने हा महिना संपेल. हा संपूर्ण महिना जप, तप आणि ध्यानासाठी सर्वोत्तम मानला जातो.

मार्गशीर्ष महिन्यात या देवतांची पूजा करा

  • या पवित्र महिन्यात या देवतांची पूजा केल्याने जीवनात आनंद, सौभाग्य आणि समृद्धी येते:
  • भगवान विष्णू आणि श्री कृष्ण: ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा दररोज जप करा आणि श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करा.
  • लक्ष्मी देवी : मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात धन आणि समृद्धी येते.
  • तुळशीची पूजा: या महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशीला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा मारा.
  • चंद्र: मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे मानसिक समस्यांपासून मुक्तता मिळते.
  • स्नान, दान आणि दिवे लावण्याचे विशेष महत्त्व

पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे

या महिन्यात सूर्योदयापूर्वी गंगा, यमुना किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत फायदेशीर आहे. जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात तुळशीची पाने घालावीत.

स्नान करताना ‘ओम नमो भगवते नारायणाय’ किंवा गायत्री मंत्राचा जप करावा.

दिवे लावणे

मार्गशीर्ष महिन्यात दिवे लावण्याच्या प्रथेला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ आणि देवघरात दिवे लावावेत. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मकता येते.

दानाचे विशेष महत्त्व

या महिन्यात आपल्या क्षमतेनुसार अन्न, कपडे, ब्लँकेट, गूळ आणि तीळ दान करणे खूप शुभ मानले जाते.

मार्गशीर्ष महिन्याचे धार्मिक महत्त्व

मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान श्रीकृष्ण यांना खूप प्रिय आहे. हा महिना आध्यात्मिक शुद्धीकरण आणि भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. तर हा महिना स्वतः भगवान श्रीकृष्णाचे अवतार मानला जातो. संपूर्ण महिन्यात त्यांची विशेष पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली. म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष आहे. असे मानले जाते की या महिन्यात भक्तीने केलेले शुभ कार्यांने मोक्ष प्राप्त होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...