Mashashivratri : महादेवाला पुर्ण प्रदक्षीणा का मारू नये, तुम्हाला माहिती आहे का हे कारण?

रूद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे. सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते.

Mashashivratri : महादेवाला पुर्ण प्रदक्षीणा का मारू नये, तुम्हाला माहिती आहे का हे कारण?
शिवलींगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 10:58 AM

मुंबई, शिवलिंग (Shivlinga) म्हणजे शिवाचे प्रतीक किंवा शिवाचे मूळ-शाश्वत रूप. शिवलिंगाचे पूजन केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताला दुःखापासून मुक्ती मिळते. शिवलिंग पूजेचे काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहेत. शिवलिंगावर जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक केल्यानंतर चंदनाचा लेप लावून बेलपत्र, धतुरा आणि बेल फळं अर्पण केले जातात. रूद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे. सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते. भक्तांचे मनोरथ रुद्राभिषेकानी पूर्ण होतात. महादेवाची संपुर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जाते.

शिवलिंग परिक्रमेशी संबंधित नियम

  1. साधारणपणे सर्व देवतांची संपूर्ण प्रदक्षिणा केली जाते. मात्र शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करण्याचा नियम आहे.
  2. शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना दिशेचेही विशेष महत्व आहे. सर्व पूजेत देवतांची प्रदक्षिणा उजव्या बाजूने सुरू होते. मात्र शिवलिंगाची प्रदक्षिणा डाव्या बाजूने केली जाते.
  3. जलाशयापर्यंत प्रदक्षिणा केल्यावर विरुद्ध दिशेला मागे वळून अर्धी प्रदक्षिणा करावी. अशा प्रकारे परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमा करताना जलाशय कधीही ओलांडू नये. हे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे शारीरिक ऊर्जा नष्ट होते. कारण शिवलिंगाचे जलाशय हे ऊर्जा आणि शक्तीचे भांडार मानले जाते.
  4. पेंढा, लाकूड, पाने, दगड, वीट इत्यादींनी झाकलेल्या जलाशयाची संपूर्ण प्रदक्षिणा करणे अयोग्य मानले जात नाही.

शिवलिंग आणि शिवजींची मूर्तीपूजा यात फरक

  • आसनावर बसून शिवाच्या मूर्तीची पूजा करावी. तर शिवलिंग पूजेमध्ये मुद्रा आवश्यक नाही.
  • शंकराच्या मूर्तीची पूजा करताना पाण्यानेच अभिषेक केला जातो. तर शिवलिंगावर पाण्यासोबत दूध, दही, उसाचा रस, मध, केशर आदींचा वापर केला जातो.
  • शिवाच्या पूजेमध्ये वस्त्रे अर्पण करावीत. शिवलिंगाला वस्त्र अर्पण करणे आवश्यक नाही.
  • भगवान शिवाची पूजा करण्यासाठी तुम्ही घरामध्ये मूर्ती किंवा प्रतीमादेखील स्थापित करू शकता. मात्र घरी शिवलिंगाची स्थापना होत नाही. जर तुम्ही घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर त्यासाठी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • भगवान शिवाच्या मूर्तीमध्ये किंवा प्रतीमेमध्ये माता पार्वती देखील असते. याशिवाय अनेक मूर्तींची संपूर्ण शिव परिवार एकत्र पूजा केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना फक्त शिवजींची पूजा केली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.