Mercury Transit | ग्रहांचा राजकुमार बुधचा 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश, जाणून घ्या कुठल्या राशी असणार शुभ-अशुभ

Mercury Transit | ग्रहांचा राजकुमार बुधचा 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश, जाणून घ्या कुठल्या राशी असणार शुभ-अशुभ
Planet

सौर मंडळाच्या 9 ग्रहांपैकी बुधला राजकुमारची पदवी देण्यात आली आहे (Mercury Transit). बुध सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा आहे. याला वाणी, बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा घटक मानला जातो.

Nupur Chilkulwar

|

Apr 30, 2021 | 10:20 AM

मुंबई : सौर मंडळाच्या 9 ग्रहांपैकी बुधला राजकुमारची पदवी देण्यात आली आहे (Mercury Transit). बुध सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा आहे. याला वाणी, बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा घटक मानला जातो. 1 मे 2021 ला ग्रहांचा राजकुमार बुध मेषराशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 26 मे 2021 पर्यंत तो याच राशीत राहील (Mercury Transit In Taurus Zodiac Sign On 1st May 2021 Know The Shubh And Ashubh Effect On Other Zodiac Signs).

बुधचे हे संक्रमण 1 मे रोजी सकाळी 5 वाजून 32 मिनिटांवर होईल. बुध ग्रह अतिशय लवकर फळ देणारे मानले जातात, म्हणूनच त्याचे कार्य सामान्य माणसाच्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत. 1 मे रोजी बुध ग्रहाचे संक्रमण कोणत्या राशीसाठी शुभ आणि कोणत्या राशीसाठी अशुभ परिणाम देईल हे जाणून घेऊया –

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगलं असेल. या राशीचे लोक सर्वात कठीण विषय देखील समजण्यास सक्षम असतील. इच्छा पूर्ण होतील. अधिक खर्च करणे टाळा. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील.

वृषभ

विद्यार्थ्यांना परिश्रमानुसार निकाल मिळतील. खर्च वाढेल. शत्रू तुमची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करतील. बऱ्याच संघर्षानंतरच व्यावसायिकांना यश मिळेल. आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. लांब पल्ल्याची यात्रा कराल, गाडी चालवताना काळजी घ्या. या संक्रमणामुळे आपल्या बोलण्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून आपल्या शब्दांवर संयम ठेवा. नोकरदारांचं नशीब उजळू शकते.

मिथुन

कर्ज देण्यापूर्वी विचार करा. इतरांच्या कामात अडथळा आणू नका अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. जोडीदाराशी जवळीक वाढेल. पैशांबाबत सावध रहा. शत्रूपासून सावध रहा. कुटुंबाशी सुसंगत रहा अन्यथा संबंध आणखी बिघडू शकतात. विद्यार्थ्यांच्या मनात असंतोषाची परिस्थिती असेल.

कर्क

कुठेतरी फिरायला जाण्याची योजना बनविली जाऊ शकते. देवावर विश्वास वाढेल. दान करा. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. वडिलांची सेवा केल्यास तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आरोग्य चांगले राहील. आपण एखाद्या आजाराशी झुंज देत असल्यास, आता आपल्याला आराम मिळू शकेल.

सिंह

या राशीच्या लोकांना जीवनात चांगले बदल पाहायला मिळतील. व्यवसाय वाढू शकतो. आरोग्य चांगले राहील. शारीरिक त्रासातून आराम मिळेल. आपण आपला राग नियंत्रित करणे आवश्यक आहे. चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न होईल. व्यर्थ खर्च टाळा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कन्या

नकारात्मक विचार येऊ शकतात. अध्यात्माशी संबंधित पुस्तके वाचा आणि गुरुंचा आदर करा. तार्किक क्षमता वाढेल. आपण गणित, विज्ञान या विषयांमध्ये चांगले प्रदर्शन करण्यास सक्षम असाल. संपत्ती जमा होईल. बोलण्यात गोडवा ठेवा, तरच कार्य होईल. भाऊ-बहिणींशी चांगले संबंध ठेवा, नाहीतर परिस्थिती आणखीन बिघडू शकते.

तुळ

पैशांची परिस्थिती चांगली राहील. वैवाहिक आनंद आणि मुलांकडून आनंद प्राप्त होईल. सामाजिक कार्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. आरोग्यावर लक्ष द्या.

वृश्चिक

आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. अविवाहित असल्यास विवाहाचे योग आहेत. वडिलांच्या सल्ल्यानंतरच कोणतीही महत्त्वाची कामे करा. पैशांची समस्या असू शकते. संयम ठेवा अन्यथा कौटुंबिक त्रास वाढू शकतो. विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु

बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण वेगळं स्थान मिळवू शकता. आपली प्रतिभा पुढे येईल आणि लोक त्याचे कौतुक करतील. प्रवासाचे योग आहेत. आपण कर्जातून मुक्त होऊ शकता. आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. कृपया काहीही बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा अन्यथा वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

मकर

संघर्षानंतर कामात नक्कीच यश मिळेल. संतान प्राप्तीचे योग आहेत. जवळच्या मित्रांसमवेत वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल. आपल्याला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागू शकते. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

कुंभ

पैशांची परिस्थिती चांगली असेल. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. चाचणी केल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. बुद्धीही भ्रमित होऊ शकते. सावधगिरी बाळगा. व्यापाऱ्यांसाठी ही वेळ चांगला आहे. काम वाढवू शकते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. जे नोकरीत आहेत त्यांना पैशाचा फायदा होऊ शकतो.

मीन

भावंडांशी वैचारिक मतभेदांमुळे कुटुंबात अशांती पसरु शकते. अतिविश्वासाने नुकसान होऊ शकते. अजाणता भीती तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होईल. मित्रांसोबत प्रवास करण्यासाठी एखादी योजना बनविली जाऊ शकते. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

Mercury Transit In Taurus Zodiac Sign On 1st May 2021 Know The Shubh And Ashubh Effect On Other Zodiac Signs

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 30th April 2021 | या लोकांवर राहणार देवी लक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

Lord Shiva | ‘या’ तीन राशी असतात महादेवांना अतिप्रिय, प्रत्येक समस्या होते दूर

Zodiac Signs | या 4 राशीते लोक नेहमी राहतात टेंशन फ्री, कधीही नकारात्मकतेला स्वत:वर वर्चस्व स्थापित करु देत नाहीत

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें