AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड हजार जवान, 100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारी

रविवारी विसर्जनानिमित्त शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांसह सशस्त्र पोलीस दलाचे दीड हजार जवान तैनात राहणार आहेत. याशिवाय, अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 100 अधिकारी, 1500 सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कंपन्या, सीआरपीएफची एक कंपनी, 500 गृहरक्षक, 275 अंमलदार बंदोबस्ताला तैनात असतील.

दीड हजार जवान, 100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारी
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 10:15 AM
Share

मुंबई : दिल्ली, मुंबईसह देशातील काही राज्यांत दहशतवादी हल्ल्यांबाबत देण्यात आलेला इशारा आणि कोरोना प्रसाराचा धोका या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले. रविवारी विसर्जनानिमित्त शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांसह सशस्त्र पोलीस दलाचे दीड हजार जवान तैनात राहणार आहेत.

याशिवाय, अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 100 अधिकारी, 1500 सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कंपन्या, सीआरपीएफची एक कंपनी, 500 गृहरक्षक, 275 अंमलदार बंदोबस्ताला तैनात असतील.

चौपाटीवर बॅरिकेड्स आणि मंचासह पोलीस सज्ज

मोठ्या मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन जुहू चौपाटी आणि मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे होणार आहे. गिरगाव चौपाटीवर बाप्पाच्या निरोप घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर सर्व तयारी झाली आहे. पोलीस बॅरिकेड्स आणि मंच बनवण्यात आले आहेत, चकाचक स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच, पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. काही बीएमसी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बाप्पाच्या निरोप सोहळ्यात कोणतीही अडचण येणार नाही याची महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण काळजी घेतली जाईल. गणपती बाप्पाचे विसर्जन करणाऱ्या भक्तांनाही कोरोनाचे नियम पाळावे लागतील. समुद्र किनाऱ्यावर लोक या जयघोषाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या किंवा बाप्पाला निरोप देताना दिसतील.

गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त –

यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच आज साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-

सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत

दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत

संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46

रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)

सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)

अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ : सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी

अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती : दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी

गणेश विसर्जन 2021 ची पद्धत

– गणपतीचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांना नवीन कपडे घाला, फुलांच्या माळेने त्यांना सजवा.

– एक रेशमी वस्त्र घ्या आणि त्यात मोदक, दुर्वा, सुपारी आणि पैसे बांधा

– ही बांधलेली शिदोरी गणपतीच्या मूर्तीसोबत ठेवा.

– गणपतीची पूजा करा, आरती करा आणि कळत नकळत घडलेल्या सर्व चुकांची क्षमा मागा

– जलकुंडाजवळ पोहोचल्यानंतर गणेशाची आरती करा, त्यानंतर पश्चिम दिशेला बांधलेल्या रेशीम कापडाच्या शिदोरीसह मूर्तीचे विसर्जन करा.

संबंधित बातम्या :

Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…

अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.