Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…

गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला म्हणजेच 10 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झाली. आता अनंत चतुर्थीला बाप्पा आपल्या सर्व भक्तांचा निरोप घेईल. हिंदू श्रद्धेनुसार, विसर्जनासह तो आपल्या सर्व भक्तांच्या वेदना, दुःख आणि जीवनातील अडथळे घेऊन जातो. गणपतीला ज्ञान, शिक्षण, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे त्याला गजानन, धूम्रकेतु, एकदंत, वक्रतुंड, सिद्धी विनायक इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत...
Ganesh Visarjan

मुंबई : भगवान गणेश प्रत्येकाला ज्ञान आणि बुद्धी प्रदान करतात. प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. आतापासून काही तासांनंतरच बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जाईल.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणपतीची विधिवत स्थापना करण्यात आली. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वेळी गणपतीवर मोठ्या प्रमाणात धूम असली तरी आता ‘अनंत चतुर्दशी’च्या दिवशी बाप्पाचे विसर्जन होणार आहे.

अखेर तो दिवस आला आहे जिथे सर्व गणेशभक्त जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्याला लागेल. या दिवशी, भक्त विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाला सजवतात. त्यांची पूजा करतात. त्यानंतर मिरवणूक काढताता वाजत-गाजत, नाचत आणि रंग खेळून त्यांना निरोप देतात. भगवान विष्णूला समर्पित अनंत चतुर्दशी या तिथीला हा शुभ दिवस साजरा केला जातो.

यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच आज साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-

💠 सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत

💠 दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत

💠 संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46

💠 रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)

💠 सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)

💠 अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ : सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी

💠 अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती : दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी

गणेश विसर्जन 2021 ची पद्धत

🔶 गणपतीचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांना नवीन कपडे घाला, फुलांच्या माळेने त्यांना सजवा.

🔶 एक रेशमी वस्त्र घ्या आणि त्यात मोदक, दुर्वा, सुपारी आणि पैसे बांधा

🔶 ही बांधलेली शिदोरी गणपतीच्या मूर्तीसोबत ठेवा.

🔶 गणपतीची पूजा करा, आरती करा आणि कळत नकळत घडलेल्या सर्व चुकांची क्षमा मागा

🔶 जलकुंडाजवळ पोहोचल्यानंतर गणेशाची आरती करा, त्यानंतर पश्चिम दिशेला बांधलेल्या रेशीम कापडाच्या शिदोरीसह मूर्तीचे विसर्जन करा.

गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला म्हणजेच 10 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झाली. आता अनंत चतुर्थीला बाप्पा आपल्या सर्व भक्तांचा निरोप घेईल. हिंदू श्रद्धेनुसार, विसर्जनासह तो आपल्या सर्व भक्तांच्या वेदना, दुःख आणि जीवनातील अडथळे घेऊन जातो. गणपतीला ज्ञान, शिक्षण, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे त्याला गजानन, धूम्रकेतु, एकदंत, वक्रतुंड, सिद्धी विनायक इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार

पुण्यात विसर्जनासाठी 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त, मानाच्या गणपतींची मंडपातच विसर्जनाची तयारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI