Nag Panchami 2025: नागपंचमीच्या दिवाशी साप दिसला तर काय? जाणून घ्या चांगलं की वाईट?

Nag Panchami 2025: नागपंचमीच्या दिवशी साप दिसल्यास मिळतात 'हे' संकेत... जाणून घ्या साप दिसल्यास काय होतं? श्रावण महिन्यातील पंचमी तिथी ही नाग देवतांच्या पूजेसाठी शुभ मानली जाते.

Nag Panchami 2025:  नागपंचमीच्या दिवाशी साप दिसला तर काय? जाणून घ्या चांगलं की वाईट?
| Updated on: Jul 04, 2025 | 9:57 AM

Nag Panchami 2025: श्रावण महिन्यातील पंचमी तिथी ही नाग देवतांच्या पूजेसाठी शुभ मानली जाते. नाग पंचमी हा श्रावणातील महत्वाच्या दिवसांपैकी एक आहे. नाग पंचमीच्या दिवशी सापासोबतच भगवान शंकराची देखील पूजा केली जाते. ज्यामुळे अनेक समस्या देखील दूर होतात. हिंदू पंचांगानुसार, नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी नाग पंचमी 29 जुलै रोजी आहे. नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फलप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे.

देशभरात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी साप दिसल्याने अनेक संकेत मिळतात. नागपंचमीच्या दिवशी साप दिसणं चांगलं मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी साप दिसल्यास काय करावे ते जाणून घेऊया.

सापांची जोडी : नागपंचमीच्या दिवशी जर तुम्हाला सापांची जोडी दिसली तर समजून की, तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीत वाढ होणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सापांची जोडी दिसल्याचे संकेत म्हणजे, बराच काळापासून तुमच्या आयुष्यात सुरु असलेल्या समस्यांचा अंत होणार आहे.

शिवलिंगावर साप: नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर बसलेला साप दिसल्यास तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहे. हे देखील एक शुभ संकेत आहे. भगवान शिव आपल्या गळ्यात वासुकी साप घालतात. अशा परिस्थितीत, नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगाभोवती साप गुंडाळलेला दिसणे म्हणजे तुमचे नशीब लवकरच चमकणार आहे.

काल सर्प दोषातून मुक्ती : नागपंचमीच्या दिवशी, तुम्ही सर्पमित्राकडून सापांची जोडी खरेदी करू शकता आणि त्यांना जंगलात सोडू शकता. हा देखील एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे सापांशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण होईल. तसेच, जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर तुम्हाला त्यातूनही सुटका होईल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.