AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naga Sadhu : अशा प्रकारे होतो नागा साधूंचा अंत्यसंस्कार, हिंदू असूनही दिला जात नाही अग्नि

असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते. कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो असे म्हटले जाते.

Naga Sadhu : अशा प्रकारे होतो नागा साधूंचा अंत्यसंस्कार, हिंदू असूनही दिला जात नाही अग्नि
नागा साधूImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 15, 2023 | 4:11 PM
Share

मुंबई : नागा साधूंचे (Naga Sadhu) रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे आहे. ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी एक रहस्य राहिले आहे. नागा साधू दिसायलाही सामान्य साधूंपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. विशेषतः कुंभमेळ्यामध्ये नागा साधू मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. नागा साधूंच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सर्वसामान्यांना माहिती नाही. यापैकीच एक म्हणजे नागा साधूंचे अंतिम संस्कार!

अशा पद्धतीने होतो नागा साधूंचा अंत्यसंस्कार

सामान्यतः हिंदू धर्मात कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत. आता प्रश्न पडतो की नागा साधूही हिंदू धर्माचे पालन करतात मग त्यांचे मृतदेह का जाळले जात नाहीत.

असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते. कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो असे म्हटले जाते. नागा साधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून डोंगरावरील जंगलात राहातात. त्याचे निवासस्थान असे आहे की जेथे कोणी येत नाही.

Naga Sadhu (1)

असे म्हटले जाते की नागा साधूंमध्ये असामान्य शक्ती असते, ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात. या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाही, असे म्हटले जाते की या शक्तीच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवतो. यामुळेच कुंभमध्ये येणारे लोकं नागा साधूंना भेट देतात.

नागा साधू आपले संपूर्ण आयुष्य जंगलात किंवा डोंगरात घालवतात. त्याच्या मृत्यूनंतर, त्यांला भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात. नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असे मात्र  नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भू समाधी देण्यात येते. नागा साधूंना सिद्धयोगाच्या आसनात बसून भू-समाधी दिली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?