AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpanchami 2022: नाग पंचमीला जुळून येतोय विशेष योग, मुहूर्त आणि पूजा विधी

यावेळी मंगळवार 2 ऑगस्ट रोजी येणाऱ्या नागपंचमीला (Nagpanchami 2022) शिव आणि सिद्धी योग (shivsiddhi yog) जुळून येत आहे. नागपंचमीला शिव आणि त्यांच्या गण नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया  मंगळा गौरीचे व्रत ठेवतात आणि कुटुंबात सुख-समृद्धीची कामना करतात. शिवाशी संबंधित नागपंचमी आणि पार्वतीशी संबंधित मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) हे शिव-सिद्धी योगाचे विशेष […]

Nagpanchami 2022: नाग पंचमीला जुळून येतोय विशेष योग, मुहूर्त आणि पूजा विधी
नागपंचमी
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 21, 2022 | 9:47 AM
Share

यावेळी मंगळवार 2 ऑगस्ट रोजी येणाऱ्या नागपंचमीला (Nagpanchami 2022) शिव आणि सिद्धी योग (shivsiddhi yog) जुळून येत आहे. नागपंचमीला शिव आणि त्यांच्या गण नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया  मंगळा गौरीचे व्रत ठेवतात आणि कुटुंबात सुख-समृद्धीची कामना करतात. शिवाशी संबंधित नागपंचमी आणि पार्वतीशी संबंधित मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) हे शिव-सिद्धी योगाचे विशेष संयोजन मानले जाते. जोतिषशास्त्रज्ञांच्या मते 2 ऑगस्टला संध्याकाळी 6.35 पर्यंत शिवसिद्धी योग असेल. या काळात भाविकांनी शिवमंदिरांमध्ये नागदेवतेची पूजा करावी. तसेच महिलांनी मंगळा गौरीचे व्रत करून उपवास करावा. भक्तांना शिव आणि पार्वती या दोघांचाही आशीर्वाद मिळेल.

जिवंत सापाची नाही तर प्रतिमेची पूजा करा

शास्त्रीय मान्यतेनुसार नागदेवता हे शिवाचे गण मानले जाते. भोलेनाथ नेहमी गळ्यात नाग धारण करतात. नाग हे शिवाचे गण असल्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक जण पूजेसाठी जिवंत नाग शोधतात, हे चुकीचे आहे. मंदिरात शिवलिंगावर बसवलेल्या नागाच्या मूर्तीचीच पूजा करावी. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरी नागाच्या प्रतिमेची पूजा करावी.

सर्पदोष मुक्तीसाठी करा रुद्राभिषेक

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सर्पदोष असतो त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्प दोषाने पीडित व्यक्तीला कठोर परिश्रम करूनही योग्य यश मिळत नाही. सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण शुक्ल पंचमी तिथीला म्हणजेच नागपंचमीला शिवाचा रुद्राभिषेक करावा असे मानले जाते. रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांना सुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.

शुभ मुहूर्त

पंचमी तिथीचा प्रारंभ – 2 ऑगस्ट रोजी सकाळी 5.15 वा

समाप्ती- 3 ऑगस्ट सकाळी 5.40 वाजता

पूजा मुहूर्त- 2 ऑगस्ट रोजी सकाळी 5.40 ते 8.25 पर्यंत, एकूण कालावधी दोन तास 45 मिनिटे

अशी पूजा करा

नागदेवता आणि शिव-पार्वतीच्या मूर्तीसमोर धूप, दिवा लावावा. नागदेवतेच्या प्रतिमेला पंचामृताने स्नान करावे.   बेलपत्र आणि पांढरीफुलं वाहावी. लाह्या, बत्तासे आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. अनेकांकडे नागपंचमीच्या दिवशी कात्री, चाकू, तवा, कंगवा इत्यादींचा वापर करत नाही. ज्यांच्याकडे जी पद्धत आहे ती पाळावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल