AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेसोबत शुटिंगचा वाद विकोपाला, 3 तरुण आपसात भिडले, एकाला गच्चीवरुन खाली फेकलं

नाशिक येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महिलेसोबत शुटिंगचा वाद विकोपाला गेल्यानंतर तीन तरुण आपसात भिडले. त्यानंतर मात्र एक मोठी घटना घडली. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

महिलेसोबत शुटिंगचा वाद विकोपाला, 3 तरुण आपसात भिडले, एकाला गच्चीवरुन खाली फेकलं
| Updated on: Aug 19, 2026 | 9:14 AM
Share

कोणते वाद कधी आणि कोणत्या थराला पोहोतील काहीही सांगता येत नाही. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपलं नियंत्रण गमावते आणि त्या काही मिनीटांच्या रागातून मोठी घटना घडते. जी अत्यंत भयानक असते. आता देखील असंच काही घडलं आहे.  महिलेसोबतचा शुटिंगचा वाद विकोपाला गेला आणि त्यामध्ये एका तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला. ही घटना नाशिक याठिकाणी घडली आहे.  ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस घटनेची कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेसोबत केलेल्या शुटिंगचा वाद मनात धरत तीन तरुणांमधील वाद विकोपास गेला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुल संजय सरकटे असं मृत व्यक्तीचं नाव असून, त्याचं वय 30 वर्ष आहे. नाशिक येथील विल्होळी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

समोर  येत असलेल्या माहितीनुसार, राहुल सरकटे आणि वैभव मेंगळ यांची झटापट झाली. घराच्या गच्चीवर संशयितांनी तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. गाडेकर, खरे आणि राहुल यांच्यावर संशयितांकडून जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील राहुल याला गच्चीवरून खाली फेकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे.  अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगळ यांच्यासह तिसऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस आता प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.

वादाची सुरुवात नेमकी कशामुळे झाली. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे? तरुणाला फेकून देण्याची वेळ का आली? अशा सर्व पैलूंचा विचार करत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी देखील नाशिक येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली. गर्लफ्रेंडने मित्राच्या मदतीने घरातच बॉयफ्रेंडची गळा चिरुन हत्या केली. वसंत गोरखनाथ सातपुते असं चाळीस वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे.  कथित आरोपी महिला हसिना शेख आणि मृत वसंत सातपुते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, मृत सातपुते सतत हसिना यांचे पैसे चोरायचा आणि मद्यपान देखील करायचा. एवढंच नाही तर, त्याला जुगाराचं देखील व्यसन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेय. याच कारणामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे… पोलीस या प्रकरणाचा देखील कसून तपासा करत आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात