AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navaratri 2026 : नवरात्रीच्या काळात या वस्तू चुकूनही ठेवू नका रिकाम्या, निर्माण होतो वास्तुदोष

हिंदू धर्मामध्ये नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यंदा नवरात्रोत्सवाला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या काळात देवीची उपासना केली जाते. घटाची स्थापना देखील केली जाते, त्यामुळेच नवरात्रीला घटस्थापना असं देखील म्हटलं जातं. नवारात्रीच्या काळात काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं असतं.

Navaratri 2026 : नवरात्रीच्या काळात या वस्तू चुकूनही ठेवू नका रिकाम्या, निर्माण होतो वास्तुदोष
NavaratriImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 8:19 PM
Share

यंदा नवरात्रोत्सवाला 11 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची स्थापना केली जाते, त्यामुळे या उत्सवाला घटस्थापना असं देखील म्हटलं जातं. नवारात्रीच्या काळात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण 9 दिवस उपवास देखील करतात. आई जगदंबा मातेचं स्मरण या काळात केलं जातं. ज्यामुळे तिचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या या काळात करू नये, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. जेव्हा काही कारण नसताना आपल्या आयुष्यात अचानक अडचणी वाढू लागतात, तर ते घरात वास्तुदोष निर्माण झाल्याचे संकते असू शकतात. चला तर मग जाणून घेऊता नवरात्रोत्सवात काय करू नये?

अस्वच्छ घर – वास्तुशास्त्रानुसार नवरात्रोत्सवाच्या काळात देवीचं आगमन आपल्या भक्ताच्या घरामध्ये होतं, त्यामुळे या काळात आपलं घर स्वच्छ असावं, घरात अस्वच्छता नसावी, जिथे स्वच्छता असते त्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा होते, त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या काळात आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं, घरात अस्वच्छता नसावी.

नंदादीप – या काळात देवी पुढचा दिवा अखंड प्रज्वलित ठेवावा, दिवा कधीही मोकळा ठेवू नये, त्यामध्ये तेल किंवा शुद्ध तूप असावं. नवरात्रीच्या काळात देवी समोर नंदादीप लावावा, नंदादीप म्हणजे असा दिवा की तो अखंड सुरूच राहतो. या काळात दिव्यामध्ये नेहमी तेल ठेवावं.

तिजोरी – नवरात्रीच्या काळात आपल्या घरातील तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये, त्यामध्ये शंभर रुपये का होत नाहीत, ते असावेत. यामुळे घराला बरकत प्राप्त होते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पूजेचा कलश – वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात कधीही घरातील पुजेचा कलश हा रिकामा ठेवू नये, तो नेहमी पाण्याने भरलेलाच असावा, यामुळे तुमच्या पाठीमागचे सर्व संकट दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने