AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratiri upay : तुम्हीसुद्धा लावली असेल अखंड ज्योत तर नवव्या दिवशी अवश्य करा हा उपाय, लक्ष्मी राहील प्रसन्न

नवरात्रीच्या दिवसांत बहुतेक लोक अखंड ज्योत लावतात. अखंड ज्योत हे शुभ प्रतीक मानले जाते, लोकं त्यात जव, तांदूळ यांसारख्या धान्यांचाही समावेश करतात.

Navratiri upay : तुम्हीसुद्धा लावली असेल अखंड ज्योत तर नवव्या दिवशी अवश्य करा हा उपाय, लक्ष्मी राहील प्रसन्न
अखंड ज्योतImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 28, 2023 | 10:35 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात, नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, या दिवसात भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध विधी आणि उपाय करतात. (Navratri Upay) त्यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या झोळी आनंदाने भरते. नवरात्रीमध्ये कलश मांडणे आणि अखंड ज्योत लावणे शुभ मानले जाते. जर तुम्हीही नवरात्रीला कलश स्थापित करून अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल आणि आता नवरात्रीनंतर ती कशी बंद करायची असा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला नवमीच्या दिवशी अखंड ज्योती संबंधी काही ज्योतिषीय उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्ती होईल, मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय.

अखंड ज्योतीचे हे उपाय करा

नवरात्रीच्या दिवसांत बहुतेक लोक अखंड ज्योत लावतात. अखंड ज्योत हे शुभ प्रतीक मानले जाते, लोकं त्यात जव, तांदूळ यांसारख्या धान्यांचाही समावेश करतात. यामुळे घरामध्ये  लक्ष्मी तसेच अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो. आता तुम्ही विचार करत आहात की या धान्यांचे काय करावे?  तुम्ही त्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.

अखंड ज्योतीची वात उरली असेल तर दिवा स्वतः विझत नाही तोपर्यंत जाळू द्या. अखंड ज्योतीचा दिवा स्वतः विझवणे शुभ मानले जात नाही. यामुळे तुमची पूजा खंडित होऊ शकते.

कलश आणि अक्षत यांचे काय करायचे?

चैत्र नवरात्रीला जर तुम्ही कलशाची स्थापना केली असेल तर तुम्ही कलशासोबत ठेवलेला तांदूळ मूर्तीसोबत विसर्जित करू शकता. याशिवाय तुम्ही ते  झाडाजवळ ठेवू शकता किंवा नदीत प्रवाहित करू शकता. किंवा पक्ष्यांना खायला ठेऊ शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!