नवरात्रीत 9 दिवस दिसा स्टायलिश! प्रत्येक रंगाच्या आउटफिट सोबत अशी निवडा परफेक्ट ज्वेलरी
Navratri Fashion Tips: नवरात्रीच्या 9 दिवसांत नऊ रंगांत स्टायलिश लूक हवा? मग ड्रेसच्या रंगानुसार योग्य दागिन्यांची निवड करून तुमचा लूक अधिक आकर्षक बनवा. जाणून घ्या नऊ रंगांसोबत कोणती ज्वेलरी उठून दिसेल.

नवरात्री म्हटलं की देवीची आराधना, गरबा-दांडियाचा उत्साह आणि नटण्याची खास तयारी आलीच! यंदा 11 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या 9 दिवसांत वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करण्यासोबतच योग्य दागिन्यांची निवड करणंही महत्त्वाचं असतं. ड्रेसच्या रंगाला साजेसे कानातले, नेकलेस किंवा बांगड्या तुमचा लूक अधिक आकर्षक बनवू शकतात. महागडे दागिने खरेदी न करताही योग्य स्टायलिंगच्या मदतीने तुम्ही प्रत्येक दिवशी हटके दिसू शकता. चला, जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांच्या कपड्यांसोबत कोणती ज्वेलरी खुलून दिसेल.
नारंगी सोबत गोल्ड ज्वेलरी
नारंगी रंगाच्या कपड्यांसोबत गोल्ड टोनमधील छोटे झुमके, नाजूक नेकलेस किंवा पातळ बांगड्या छान दिसतात. ड्रेसवर भरपूर नक्षीकाम असेल, तर हेवी ज्वेलरी टाळा आणि साधे झुमके निवडा.
पांढऱा सोबत मोत्यांचे दागिने
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर मोत्यांची माळ, पर्ल स्टड्स किंवा मोत्यांचे झुमके सुंदर दिसतात. यासोबत सिल्व्हर ज्वेलरीही निवडू शकता. यामुळे लूकला साधा आणि एलिगंट टच मिळतो.
लाल सोबत कुंदन ज्वेलरी
लाल रंगाच्या कपड्यांसोबत गोल्ड आणि कुंदनचे दागिने आकर्षक दिसतात. नवरात्रीच्या पारंपरिक लूकसाठी कुंदनचे झुमके किंवा मांगटिका ट्राय करू शकता.
रॉयल ब्लू सोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी
रॉयल ब्लू रंगाच्या ड्रेसवर ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरचे मोठे झुमके किंवा सिल्व्हर चोकर छान दिसतो. गरबा आणि दांडियासाठी हा लूक खास ठरू शकतो.
पिवळा सोबत कलरफुल स्टोन
पिवळ्या रंगाच्या कपड्यांवर हिरव्या किंवा गुलाबी खड्यांचे दागिने उठून दिसतात. यामुळे ड्रेसला कॉन्ट्रास्ट मिळतो आणि लूक अधिक आकर्षक होतो.
हिरवा सोबत गोल्ड किंवा कुंदन
हिरव्या रंगाच्या ड्रेससोबत गोल्ड टोनचे झुमके, कडे किंवा हलका नेकपीस निवडा. या कलर कॉम्बिनेशनमुळे पारंपरिक लूक अधिक खुलून दिसतो.
ग्रे सोबत सिल्व्हर ज्वेलरी
ग्रे रंगाच्या कपड्यांसोबत चमकदार सिल्व्हर दागिने छान दिसतात. चांदबाली किंवा ऑक्सिडाइज्ड नेकलेस निवडल्यास लूकला पारंपरिक अंदाज मिळतो.
जांभळा सोबत मोती किंवा सिल्व्हर
जांभळ्या रंगाचा ड्रेस आधीच आकर्षक दिसत असल्याने त्यावर हलकी पर्ल किंवा सिल्व्हर ज्वेलरी निवडा. गुलाबी खडे असलेले दागिनेही या रंगासोबत छान दिसू शकतात.
मोरपंखी सोबत गोल्ड ज्वेलरी
मोरपंखी रंगाच्या कपड्यांसोबत गोल्ड टोनचे झुमके किंवा हलकी कुंदन ज्वेलरी सुंदर दिसते. यामुळे लूकला फेस्टिव्ह आणि स्टायलिश टच मिळतो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी नऊ वेगवेगळे ज्वेलरी सेट खरेदी करण्याची गरज नाही. गोल्ड टोन, सिल्व्हर आणि मोत्यांचे काही बेसिक सेट ठेवून त्यासोबत वेगवेगळ्या बांगड्या किंवा कानातले वापरल्यास प्रत्येक दिवशी नवा लूक तयार करता येईल.