Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 4 गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर आयुष्यात समस्यांचा वेढा नक्की

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 18, 2021 | 9:06 AM

दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 4 गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर आयुष्यात समस्यांचा वेढा नक्की
kartik paurnima
Follow us

मुंबई :  दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. यावेळी कार्तिक पौर्णिमा शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी आहे. कार्तिक पौर्णिमा 2021 ही पौर्णिमा सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवाळीतही घरोघरी दिवे लावून पूजा केली जाते. असे म्हणतात की या पौर्णिमेच्या पूजेने देव नेहमी प्रसन्न होतो.या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा अंत केला होता. या आनंदात देवतांनी दिवा लावून हा दिवस साजरा करण्यात येते.

कार्तिक पौर्णिमाचे महत्त्व

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमाचे अधिक महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते. याच दिवशी महादेव शिवशंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे. म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. या दिवशी शिव मंदिरात अखंड वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी दिवाळीचा शेवटचा दिवस आहे असे मानले जाते.

कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी दान करा

या दिवशी पूजा, दान इत्यादी केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. विष्णु पुराणानुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने मत्‍स्‍यावतार घेतला होता. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर ती गोष्ट पवित्र मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते.

कार्तिक पौर्णिमेला या चुका करू नका

कार्तिक पौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिवस आहे, त्यामुळे या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. कोणाशीही गैरवर्तन करण्याची आणि अपशब्द न बोलण्याची चूक करू नका.

या दिवशी शक्यतो तामसी पदार्थांचे सेवन करू नये. या दिवशी मांसाहार आणि मद्यपान केल्याने जीवनात संकटे येतात, याची विशेष काळजी घ्या.

या दिवशी कोणत्याही असहाय किंवा गरीब व्यक्तीचा अपमान करु नका.

या पवित्र दिवशी नखे आणि केस कापणे देखील टाळावेत, असे केल्यास जीवनात संकटांना आमंत्रण मिळते.

हा आहे शुभ काळ

पौर्णिमा तिथी सुरू होते: 18 नोव्हेंबर, गुरुवार दुपारी 12 वाजल्यापासून

पौर्णिमा तारीख समाप्त: 19 नोव्हेंबर, शुक्रवार दुपारी 02:26 पर्यंत

प्रदोष काल मुहूर्त : 18 नोव्हेंबर 05:09 ते 07:47 मिनिटे

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे.

यशाच्या शोधात आहात? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी आत्मसात करा

Vastu Tips | हातात पैसा टिकत नाहीय? वास्तुशास्त्रानुसार ही 5 झाडे घरात लावा पैसाच पैसा येईल

Shaadi Muhurat 2021 : लग्न, गृहप्रवेश, घर-गाडी खरेदीची योजना आखताय? जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरचे शुभ मुहुर्त

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI