Navratri 2023 : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा ‘माता ब्रम्हचारिणी’ची उपासना, पांढऱ्या रंगाला का आहे महत्त्व?

सगळ्या रंगांचे मिश्रण म्हणजे पांढरा रंग. पण त्याला साधेपणा, सात्विकता, सगळ्यात शांत, शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवतो. थोडक्यात पाटी कोरी करून नव्याने अक्षरं गिरवण्याचा हा रंग.

Navratri 2023 : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा 'माता ब्रम्हचारिणी'ची उपासना, पांढऱ्या रंगाला का आहे महत्त्व?
MATA BRAMHCHARINI NAVRATRI DAY 2Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 3:33 PM

मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 | नवशक्तीपैकी ब्रम्हचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हचारिणी ही शांत स्वभावाची. तिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि दिव्य आहे. उजव्या हातात जप माळा आणि डाव्या हातात कमंडलू असे हिचे स्वरूप आहे. तपाचे आचरण करणारी म्हणजे ब्रम्हाचारिणी. चंद्राला सफेद अर्थात पांढऱ्या रंगाचे वस्त्र जास्त प्रिय आहे. म्हणून नवरात्रीमध्ये सोमवारी पांढऱ्या रंगाच्या वस्त्राला जास्त प्राधान्य दिले जाते.

विजय आणि सिद्धी प्राप्त होते

नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी साधकाचे मन यस्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला माता ब्रम्हचारिणीची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. हिची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.

संघर्ष टाळणे, सुंसवाद साधणे हे द्योतक

ब्रम्हचारिणी मातेला शुभ्र अर्थात पांढरा रंग अतिप्रिय आहे. हा रंग चंद्रालाही प्रिय आहे. माता ब्रम्हचारिणी आणि चंद्र हे दोन्ही मनाला शांती प्रदान करतात. त्यामुळेच पांढरा रंग शांती, मांगल्य, स्वच्छता, पवित्रतेचा, निरागसतेचा निदर्शक आहे. सेवाभावी वृत्ती आणि समाजकार्याची आवड. संघर्ष टाळणे, सुंसवाद साधणे हे याचे द्योतक आहे.

हे सुद्धा वाचा

सफेद रंगाला प्रथम पसंती देणाऱ्या व्यक्ती सकारात्मक असतात. त्यांचा स्वभाव मोकळेपणाच असतो. या व्यक्ती इतरांना समजून घेतात. कालचा दिवस विसरून रोज नव्या उमेदीने संसाराचा गाडा ओढणाऱ्या स्त्रीयांचा हा आवडता रंग.

एका अर्थी खरी ब्रम्हचारिणी!

पांढरी रांगोळी असल्याशिवाय पुर्ण रांगोळी बनत नाही. या रंगात इतर रंग भरले तर त्याची आकर्षकता वाढते. सगळ्या रंगाना एकत्र ठेवायला परत पांढरी रांगोळीचं लागते. आजचे देवीचे रुप ब्रम्हचारिणी! तशाच या स्त्रिया. आजूबाजूच्या सर्वांचा समतोल राखून आपल्या घराचे रंग उठावदार करणारी स्त्री. कोणत्याही प्रकारे संसाराचा भार वाहणारी स्त्री. यात ग्रामीण भागातील शेती, जनावरे, दुध-दुभत, सणवार सांभाळणाऱ्या आणि शहरातील घर, नातेवाईक, पाहुणे, ताळेबंद आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून अनेक आघाड्यावर यशस्वी ठरणारी स्त्री अभिप्रेत आहे. एका अर्थी खरी ब्रम्हचारिणी!

रश्मी पांढरे ( लेखिका निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.