AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टी, व्यवसायात होईल भरभराट

प्रदोष व्रत हे महादेवाला समर्पित आहे. प्रदोष व्रताचा महिमा शिवपुराणात सांगितला आहे. या दिवशी महादेवाची उपासना केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टी, व्यवसायात होईल भरभराट
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Feb 21, 2025 | 7:25 PM
Share

प्रदोष व्रत हिंदू धर्मात विशेष मानले जाते. प्रदोष व्रत दर महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येते. ज्या दिवशी प्रदोष व्रत असते त्या आठवड्याच्या दिवसावरून प्रदोषाचे नाव असते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये, प्रदोष व्रत महादेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवशी महादेवाची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे.

धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत आणि उपासना केल्याने महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होते. या दिवशी प्रदोष काळात पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी उपवास आणि उपासना केल्याने जीवनात धन आणि आनंद वाढतो. असे मानले जाते की या दिवशी पूजेच्या वेळी महादेवाला काही विशेष वस्तू अर्पण केल्यास व्यवसायात इच्छित यश आणि लाभ होतो. जाणून घेऊ त्या खास गोष्टी कोणत्या आहेत.

कधी आहे प्रदोष?

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:47 वाजता सुरू होईल. तसेच 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता समाप्त होईल. यामुळे प्रदोष व्रत 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या दिवशी मंगळवार आहे त्यामुळे याला भौम प्रदोष असे म्हटले जाईल.

या वस्तू शिवलिंगाला अर्पण करा

प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला दूध, दही, मध इत्यादी अर्पण करावे. तसेच मंत्रांचा जप करावा. असे मानले जाते की या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्याने आणि मंत्रोच्चार केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने व्यवसायात वृद्धी होते.

प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगाला गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने व्यावसायिकाला अपेक्षित नफा मिळतो.

प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. आर्थिक फायदाही होतो.

शिवलिंगावर तुळस, हळद आणि कुंकू चुकूनही अर्पण करू नये. असे मानले जाते की यामुळे महादेव क्रोधित होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत