
जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे हल्ला केला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 मेच्या मध्यरात्री त्याचा बदला घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी तळांवर थेट हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरसह लाहोर, रावळपिंडीजवळील दहशतवादी तळं नष्ट करण्यात आली. तर 100 दहशतवादी ठार केले. या धाडसी कारवाईमुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानने दोन दिवसांपासून भारतीय सीमा रेषेजवळील शहरांवर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले सुरू केले आहेत. ते हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. अशात ग्रहांची स्थिती कशी आहे, त्याचा कोणाला फायदा होईल? याविषयी ग्रहांचे काय आहे भाकीत?
ग्रहांची चाल काय?
7 मे 2025 रोजी रात्री 1:30 वाजता भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यावेळी ग्रहस्थिती अनुकूल होती. त्यावेळी कुंडलीत मकर लग्न स्थानात होते. मकर राशीचा स्वामी शनि देव आहे. ते कुंडलीच्या तिसर्या भावात विराजमान होते. तिसरा भाव हा पराक्रम, साहस आणि शेजारी देशांशी संबंध दर्शवतो. तर युद्धाचे कारक असलेले ग्रह मंगळ आणि बुध हे देखील शनिसोबतच तिसऱ्या भावात होते. शुक्र हा उच्च स्थितीत होता. एकूणच हल्ला करताना, ऑपरेशन सिंदूरवेळी ग्रहकाळ भारतासाठी अत्यंत अनुकूल, निर्णायक होता. या ग्रहयोगांमुळे भारताने ठोस पावले टाकली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले.
.
वैदिक ज्योतिषानुसार, या वर्षाची सुरुवात 6 मोठ्या ग्रहांच्या युतीने झाली आहे. ही स्थिती देशाची सुरक्षा आणि सीमेवरील तणाव दर्शवते. येत्या काळावर नजर टाकली तर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. खासकरून मंगळ ग्रहाची स्थिती आणि गुरूचे राशी परिवर्तन यामुळे येता काळ थोडा कसोटीचा असेल.
मग आता पुढे काय?
कुंडलीत शुक्र, शनि आणि राहुची बैठक पाहिली असता, भारतापेक्षा पाकिस्तानला अधिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानकडील जीवितहानी, वित्तहानी दीर्घकाळासाठी होईल, असे दिसते. जर पाकिस्तानने आगळीक करत भारताशी युद्ध छेडले तर पाकिस्तानचे कंबरडे मोडू शकते. सध्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून पाकिस्तान भारताशी युद्ध करणार नाही, असे चिन्हं दिसत आहेत. पाकिस्तान तरीही कुरापती सुरूच ठेवणार आहे आणि त्याला तसाच मोठा तडाखा बसणार आहे. भारताने अजूनही यु्द्धाची घोषणा केलेली नाही.