AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : “तुम्ही आहात म्हणून…” ऑपरेशन सिंदूर दरम्यान विराट कोहलीची भारतीय लष्करासाठी भावुक पोस्ट, चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस

Virat Kohli Instagram Post for Indian Army: भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने भारत पाकिस्तानमधील तणावात एका भावुक पोस्ट केली आहे. सध्या भारताने पाकिस्तानला जेरीस आणले आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने पाकचा थयथयाट सुरू आहे. तर पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट करण्यात आले आहेत.

Virat Kohli : तुम्ही आहात म्हणून... ऑपरेशन सिंदूर दरम्यान विराट कोहलीची भारतीय लष्करासाठी भावुक पोस्ट, चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस
ऑपरेशन सिंदूर, विराट कोहलीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 09, 2025 | 3:00 PM
Share

गेल्या तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले नाही तर लाहोर, कराची, रावळपिंडीसह इतर शहरातील एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केली आहे. पाकिस्तानचा त्यामुळे थयथयाट झाला आहे. पाकिस्तानने गेल्या दोन दिवसांपासून भारतावर हमास पॅटर्नने मिसाईल आणि ड्रोनचा एकामागून एक हल्ले केले. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने आणि एअर डिफेन्स सिस्टिम एस-400 ने हाणून पाडले आहे. त्यामुळे पाकड्यांचा जळपळाट सुरू आहे. भारत-पाकमधील या तणावदरम्यान क्रिकेटर विराट कोहली याने भारतीय लष्करासाठी एक भावुक पोस्ट केली आहे.

विराटची आर्मीसाठी खास पोस्ट

विराट कोहलीने भारतीय लष्कराला उद्देशून एक भावुक पोस्ट केली आहे. या कठीण परिस्थिती आपण सर्व सशस्त्र दलाच्या एकजुटतेने पाठीशी आहोत. भारतीय लष्कराला मी सलाम करतो. आपल्या या बहादुर सैनिकांच्या या शौर्याबाबत आपण त्यांचे कायमचे ऋणी आहोत. आपल्या महान राष्ट्रासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या बलिदानाबाबत मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, अशी पोस्ट विराटने इन्स्टाग्रामवर केली आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. सर्वांनी भारतीय सैन्य आणि सैनिकांचे आभार मानले आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

मिट्टीमें मिला दिया

22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला होता. त्यात 26 पर्यटकांचा जीव गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सभेत या हल्ल्यामागील सर्वांना धडा शिकवण्याचे आणि त्यांना नष्ट करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला होता. त्यानंतर 15 दिवसानंतर 7 मे रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानमध्ये घुसून जवळपास 100 दहशतवाद्यांना मारले. त्यानंतर लाहोर, कराचीसह इतर शहरातील एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केली. त्यानंतर पाकिस्तानने गेल्या दोन दिवसांपासून भारतावर हमास पॅटर्नने ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. त्यातील अनेक हवेतच नष्ट करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढतच आहे. त्यात कराची बंदरावर सुद्धा भारतीय नौदलाने जबरदस्त हल्ला चढवला. त्यामुळे पाकिस्तान सरकार बेजार झाले आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.