AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palmistry: हातावर हे खास निशाण? मग मंत्री पद पक्कं! तळाहातावर हा चमत्कारी राजयोग, रात्रीतूनच पालटणार नशीब

Palmistry special marks on the palm: सध्या दिल्लीत कॅबिनेट विस्ताराची चर्चा होत आहे. कुणाला मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार याची रस्सीखेच सुरू आहे. तुमच्याही हातावर जर हे खास निशाण असेल तर मग मंत्री पद पक्कं आहे, काय सांगते हस्तमुद्रिका शास्त्र?

Palmistry: हातावर हे खास निशाण? मग मंत्री पद पक्कं! तळाहातावर हा चमत्कारी राजयोग, रात्रीतूनच पालटणार नशीब
| Updated on: Jul 14, 2026 | 4:44 PM
Share

Palmistry special marks on the Hand: तळहातात भाग्याची किल्ली आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. पण हे खास चिन्ह असेल तर रात्रीतूनच तुमचं नशीब पालटू शकतं. तळहातावरील हा राजयोग, नशीब उघडवू शकतो. ही खूण मनुष्याला केवळ अफाट धन आणि संपत्तीच देते असे नाही. तर समाजात त्याचे महत्त्व आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मदत करते. खासकरून राजकीय क्षेत्रातील लोकांच्या तळहातावर जर हे चिन्ह असेल तर त्याचे मंत्री पद पक्कं मानलं जाते.

भाला आणि धनुष्याचा इशारा

तुमच्या तळहातावर भाला, धनुष्य वा बाण सारखी एखादी निशाणी असेल, तर हे अत्यंत भाग्यकारक मानले जाते. याचा अर्थ तुमच्यावर कितीही संकटं आली तरी तुम्ही त्या अडचणीवर सहज मात करू शकता आणि पुढे जाऊ शकता. हे लोक स्वभावाने अत्यंत धाडसी आणि निडर असतात. नोकरी असो वा व्यवसाय, ज्यामध्ये हे लोक हात घालतात. त्यात त्यांना यश मिळते, त्यांचा सन्मान वाढतो.

चक्राचे निशाण, राजेशाही सूख

तळहातवर जर चक्रासारखे निशाण असेल तर हा दुर्मिळ आणि शुभ योग मानल्या जातो. बोटं आणि तळहात यांच्या मध्यभागी चक्रासारखे निशाण असेल तर मनुष्याचे जीवन राजासारखे होते. असे लोक जन्मतःच नेतृत्वाशाली असतात. त्यांच्याकडे पैसा, संपत्तीची कमी नसते. हे त्यांच्या बुद्धीने कमी वयातच मोठी गवसणी घालतात. हे जर साधारण कुटुंबातून आले असले तरी कष्ट आणि नशीबाच्या बळावर मोठ्या पदाला गवसणी घालतात.

ध्वजाची खूण आणि मंत्रि‍पदाची लॉटरी

राजकीय जीवनात मंत्रिपद मिळणे हे सोपे नसते. अनेकदा आमदारकी, खासदारकीच्या अनेक टर्म झाल्यावरही मंत्रि‍पदाची माळ गळ्यात पडत नाही. पण ज्यांच्या तळहातावर ध्वजासारखी, झेंड्यासारखी खूण असते. त्यांच्या जीवनात मंत्रि‍पदाची संधी चुकत नाही. हस्तमुद्रिका शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या हातावर ध्वजाची खूण असते, त्या व्यक्तीला राजकीय जीवनात मोठे यश मिळते. ते केवळ निवडणूकच जिंकत नाही तर सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करतात.

असं म्हणतात की, तळहातावरील रेषा या मनुष्याच्या नशीबाचा आरसा असतो. अनेकदा आपण निराश होतो तेव्हा तळहात तोंडावर घेतो. त्यातच तुमच्या चमत्कारीक राजयोगाचे रहस्य दडलेले असते. योग्यवेळी तुम्हाला फळ मिळते. त्यासाठी वेळ आणि काळ तुमच्या बाजूने असावा लागतो.

(डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून घेतलेली माहिती आहे, टीव्ही9 मराठी त्याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी