AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parshurama Jayanti 2021 | राम ते भगवान परशुराम कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी

अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो (Parshurama Jayanti 2021). या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील आहे.

Parshurama Jayanti 2021 | राम ते भगवान परशुराम कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी
Parshuram
| Updated on: May 10, 2021 | 12:49 PM
Share

मुंबई : अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो (Parshurama Jayanti 2021). या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील आहे. धार्मिक मान्यतेनुसार, परशुराम भगवान विष्णूच्या दहा अवतारांमधील सहावा अवतार होता आणि महर्षी जमदग्नि आणि रेणुका यांचा मुलगा होता. यावेळी परशुराम जयंती 14 मे 2021 रोजी साजरी केली जाईल (Parshurama Jayanti 2021 Know The Interesting Facts About Lord Parshurama).

परशुराम देवाबद्दल अशीही एक मान्यता आहे की ते सात चिरंजीवी पुरुषांपैकी एक आहे आणि ते अजूनही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे काय परशुरामच्या जन्माच्या वेळी त्यांचे नाव राम होते. मग ते रामापासून परशुराम कसे झाले? भगवान परशुराम संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या.

परशुराम नाव कसे मिळाले

भगवान परशुरामांच्या जन्माच्या वेळी त्यांचे नाव ‘राम’ ठेवले गेले. वडील जमदग्नीच्या आज्ञेनुसार राम हे मोठे झाल्यावर ते महादेवाची तपश्चर्या करण्यासाठी हिमालयावर निघून गेले. त्याच्या कठोर तपस्येने आनंदी होऊन महादेवांनी त्यांना बरीच शस्त्रे दिली, त्यातील एक फरसा होता. फरसाला परशु असेही म्हणतात. या फरसाला दारण केल्यानंतर त्यांना रामऐवजी परशुराम असे म्हटले जाऊ लागले.

सीता स्वयंवर दरम्यान परशुराम आणि रामांची भेट

माता सीतेच्या स्वयंवरावेळी पहिल्यांद राम आणि परशुराम या दोन रुपांच्या रुपात विष्णू समोरासमोर आले आणि दोघांची भेट झाली.

गणपतीचा एक दात तोडला

परशुराम अत्यंत रागीट स्वभावाचे होते. एकदा ते भगवान शिवला भेटायला गेले. तेव्हा भगवान शिव अध्यात्मिक अभ्यासामध्ये मग्न होते. म्हणून गणपतीने त्यांना महादेवांना भेटण्यापासून रोखले. यामुळे ते इतके संतापले की त्यांनी शिवाने दिलेल्या परशुने गणेशावर प्रहार केला. हा प्रहार सहन करण्यासाठी गणपतीने आपला दात पुढे केला. अशाप्रकारे, गणेशाचा एक दात तुटला आणि तेव्हापासून गणपतीला एकदंतही म्हटले जाऊ लागले.

श्रीरामांनी त्यांचा अभिमान तोडला

एकदा परशुराम अयोध्येला गेले, तेव्हा राजा दशरथ यांनी भगवान श्रीरामांना परशुरामांना राजवाड्यात आणण्यासाठी पाठवले. परशुरामांनी जेव्हा श्रीरामच्या सामर्थ्याविषयी ऐकले तेव्हा त्यांना भगवान श्रीरामची परीक्षा घ्यायची इच्छा झाली आणि त्यांनी भगवान राम यांना दैवी धनुष्य दिले आणि म्हणाले, की याची प्रत्यंचा चढवून दाखव. श्रीरामांनी ते करुन दाखवलं. यानंतर त्यांनी श्रीरामांना एक दिव्य बाण दिला आणि धनुष्यावर चढवण्यास सांगितले. श्रीरामांनी ते देखील केले. परशुराम हे पाहून आश्चर्यचकित झाले. मग भगवान श्री रामांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली आणि त्यांच्या वास्तविक स्वरुपाचे दर्शन घडवून आणले. यानंतर, त्यांनी दैवीय बाणांनी परशुरामांचा अभिमान मोडला.

Parshurama Jayanti 2021 Know The Interesting Facts About Lord Parshurama

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कामं नक्की करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.