AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Price Hike: धूपबत्ती, उदबत्तीला महागाईचा धूर; कच्या मालाच्या भाववाढीने पूजा साहित्य महाग

गेल्या वर्षभरात सातत्याने इंधन दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी कधीच ओलांडली आहे.  याचा परिणाम थेट महागाईवर (inflation) होताना दिसत आहे. किरणा माल आणि भाजीपाल्यासोबतच पूजेचे साहित्यसुद्धा महाग  झाले आहे. येणारे दिवस हे सणावारांचे आणि व्रत वैकल्यांचे आहे. या दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणात पूजेच्या साहित्यांची खरेदी होते. अशातच पूजेचे साहित्य महाग झाल्याने आता […]

Price Hike: धूपबत्ती, उदबत्तीला महागाईचा धूर; कच्या मालाच्या भाववाढीने पूजा साहित्य महाग
| Updated on: Jul 10, 2022 | 4:50 PM
Share

गेल्या वर्षभरात सातत्याने इंधन दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी कधीच ओलांडली आहे.  याचा परिणाम थेट महागाईवर (inflation) होताना दिसत आहे. किरणा माल आणि भाजीपाल्यासोबतच पूजेचे साहित्यसुद्धा महाग  झाले आहे. येणारे दिवस हे सणावारांचे आणि व्रत वैकल्यांचे आहे. या दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणात पूजेच्या साहित्यांची खरेदी होते. अशातच पूजेचे साहित्य महाग झाल्याने आता सणासुदीच्या खर्चातही वाढ होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेच्या साहित्यांमध्ये उदबत्तीही जास्त महाग झाली आहे. स्थानिक ते ब्रँडेड अगरबत्तीच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर धूपबत्तीसुद्धा महाग झाली आहे. 25 रूपये पाव अगरबत्तीची किंमत 30 ते 35 रुपये आहे. आणि 30 रूपयाला मिळणाऱ्या उदबत्तीचे दर थेट 40 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे इतर ब्रँडेड अगरबत्तीच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे, मात्र कोरोनाकाळात ज्या उदबत्तीच्या मागणीत 25 ते 30 टक्के वाढ झाली होती त्यामध्ये आता घट झाली आहे.

केमिकल, डिपिंग तेलाच्या दरात वाढ

उद्बत्तीत वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समध्ये पहिले 5 टक्के जीएसटी लागत होता जो आता वाढून 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचप्रमाणे डिपिंग ऑयलचे दर पूर्वी 140 रूपये प्रती लिटर होते जे आता वाढून 200 रूपये लीटरपर्यंत पोहोचले आहे. याप्रकारे दोन्ही प्रकारच्या उद्बत्तीत वापरल्या जाणाऱ्या कच्चा मालात वाढ झाल्यामुळे उद्बत्तीच्या दरात वाढ झाल्याचे उद्बत्ती व्यापाऱ्यांनी सागितले.

कच्चामालात वाढ, कापूरमध्ये किंचीत घसरण

  1. दुसरीकडे, अगरबत्ती बनवण्यासाठी वापरले जाणारे गोल काड्या बाहेरून मोठ्या प्रमाणात मागवल्या जातात, जे महाग असल्याचे सिद्ध होते.
  2.  या कारणांमुळे आता लोकांना उदबत्ती खरेदी करण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहे.
  3.  याचप्रकारे धूप उद्बत्तींमध्ये काहींचे दर 30 रूपये पाव, तर काही 35 ते 40 रूपये पाव सांगितल्या जात आहे.
  4.  देवाला लावल्या जाणाऱ्या अष्टगंधाच्या दरातही वाढ झाली आहे. ज्या अष्टगंधाची लहान डबी 30 रुपयात मिळत होती, ती आता 35 रुपयांच्या दरात मिळत आहे.
  5.  दुसरीकडे, जर आपण कापूरबद्दल बोललो तर त्याच्या किमतींमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. कोरोनाच्या काळात 1,200 ते 1,600 रुपये विकल्या जाणाऱ्या कापराची किंमत 950 ते 1000 रुपये किलोपर्यंत सुरू आहे.

याशिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत साबुदाणा, तेल, शेंगदाणे, साखर इत्यादी वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याने उपासाचे पदार्थसुद्धा महाग झाले आहेत . वाढत्या महागाईमुळे उपवास कडक करण्याची वेळ आता लोकांवर आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.