AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir Utsav : मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव, राम मंदिर उदघाटनासाठी मुंबई भाजप सज्ज

राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव मुंबईतही साजरा होणार आहे. मुंबईतील अनेक मंदिरात प्रभू रामाची आरता केली जाणार आहे. मुंबईतील सर्व वार्डात आयोध्येतील राममंदिराचा कार्यक्रम  लाईव्ह दाखवणार आहे. या शिवाय येत्या दिवसात सर्व विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना रामललाचं दर्शन घडवणार आहे.

Ram Mandir Utsav : मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव, राम मंदिर उदघाटनासाठी मुंबई भाजप सज्ज
अयोध्या रामललाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 28, 2023 | 2:33 PM
Share

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) रामललाच्या  प्राणप्रतिष्ठापणेचा भव्य कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण देशात उत्सव साजरा होणार आहे. मुंबई भाजपने देखील हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. भाजपकडून मुंबई राममय केली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे असे भाजपचे मत आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार आहे. याची तयारी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने केली जात आहे.

22 जानेवारी नंतर प्रत्यक्ष राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घ्यावं म्हणून प्रत्येक विधानसभेतून एक विशेष ट्रेन करून सामान्य नागरिकांना भगवान रामाच्या दर्शनाला घेवुन जाणार आहोत अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक विधानसभेतील नागरिकांना घडवणार रामललाच दर्शन

राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव मुंबईतही साजरा होणार आहे. मुंबईतील अनेक मंदिरात प्रभू रामाची आरता केली जाणार आहे. मुंबईतील सर्व वार्डात आयोध्येतील राममंदिराचा कार्यक्रम  लाईव्ह दाखवणार आहे. या शिवाय येत्या दिवसात सर्व विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना रामललाचं दर्शन घडवणार आहे. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयातही आठ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. भाजपचे अनेक पदाधीकारी या कार्यक्रमाला हजर राहाणार आहे. एकंदरीतच भाजप निवडणूकीच्या दृष्टीने याचा फायदा करून घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान