AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामनवमीच्या दिवशी दुर्मिळ योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांवर भगवान श्री राम यांची विशेष कृपा

Ram Navami 2024 : यांच्या वर्षी रामनवमीच्या दिवशी दुर्मिळ योग, 'या' तीन राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा... त्यांच्यावर असणार प्रभू श्री राम यांची कृपा... यंदा रामनवमीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामाची जयंती साजरी होणार आहे. सध्या देशात रामनवमीचा उत्साह

रामनवमीच्या दिवशी दुर्मिळ योग, 'या' तीन राशीच्या लोकांवर भगवान श्री राम यांची विशेष कृपा
| Updated on: Apr 16, 2024 | 12:27 PM
Share

यंदाच्या वर्षी 17 एप्रिल 2024 मध्ये रामनवमी आहे. दरवर्षी रामनवमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात आणि श्री राम यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी असते. यंदा रामनवमीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामाची जयंती साजरी होणार आहे. म्हणून देशात आनंदाचं वातावरण आहे. रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. या काळात नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा करून तिला निरोप दिला जातो.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी रामनवमीला अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे. जो त्रेतायुगात प्रभू रामा यांच्या जन्माच्या वेळी घडला होता… तोच योग यंदाच्या वर्षी देखील आल्याचं म्हणत आहे. रामनवमीला एक दुर्मिळ योग सूचित करत आहे. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळतील.

कोणत्या राशीच्या लोकांवर असणार श्री राम यांची विशेष कृपा?

मेष राशी – रामनवमीला मेष राशीच्या लोकांवर श्री राम यांची विशेष कृपा असणार आहे. देवगुरू बृहस्पति स्वतः सूर्य देवासोबत मेष राशीत आहे. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत चांगले लाभ मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

तूळ राशी – तूळ राशीच्या लोकांसाठी यंदाची रामनवमी खूप शुभ असणार आहे. राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयी मिळतील. जे लोक दीर्घकाळापासून एखाद्या योजनेवर काम करत आहेत, त्यांच्या योजना यशस्वी होतील आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्याची शक्यता आहे.

मीन राशी – रामनवमीला मीन राशीच्या लोकांवर श्री राम यांची विशेष कृपा असणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदित होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तुमच्या समस्या संपतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा देखील दिसून येईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यांनी नशिबाची साथ मिळणार आहे.

( डिस्क्लेमर :वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.