AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिझर्व बँकेने काढली 500 रूपयांची रामाचा फोटो असलेली नवी नोट? व्हायरल होत असलेल्या या फोटोमागचे नेमके सत्य काय?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या 500 रूपयांच्या नोटेच्या फोटोवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एवजी प्रभू रामाचा फोटो दिसत आहे. याशिवाय जिथे लाल किल्ल्याचा फोटो आहे, तिथे अयोध्येत राम मंदिर बांधल्याचा फोटो आहे. प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

रिझर्व बँकेने काढली 500 रूपयांची रामाचा फोटो असलेली नवी नोट? व्हायरल होत असलेल्या या फोटोमागचे नेमके सत्य काय?
श्री रामाचा फोटो असलेली 500 रूपयांची नोट Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 17, 2024 | 3:36 PM
Share

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा अभिषेक होत असताना, भगवान श्री राम आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या फोटोसह 500 रुपयांच्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे.  बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रांसह 500 रुपयांच्या नोटांची नवीन मालिका जारी करणार आहे का? RBI 500 रुपयांची नोट (Shri Ram 500 Rupees Note) जारी करणार आहे का ? झपाट्यानं व्हायरल होत असलेल्या या फोटोमागे खरं खोटं काय आहे ते जाणून घेऊया.

महात्मा गांधींऐवजी श्रीरामाचे चित्र

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या 500 रूपयांच्या नोटेच्या फोटोवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एवजी प्रभू रामाचा फोटो दिसत आहे. याशिवाय जिथे लाल किल्ल्याचा फोटो आहे, तिथे अयोध्येत राम मंदिर बांधल्याचा फोटो आहे. प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

एकीकडे ही नोट व्हायरल होत आहे, मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटांच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आणि व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्वनी राणा म्हणाले की, अशी कोणतीही घोषणा केली गेली नाही किंवा आरबीआयने कोणतीही माहिती दिली नाही. ते म्हणाले की, ही खोटी बातमी आहे. आरबीआय 500 रुपयांच्या नव्या सीरिजच्या नोटा जारी करणार नाही.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रासह 500 रुपयांच्या नव्या नोटांची मालिका जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून 2022 मध्ये, आरबीआय सध्याच्या चलन आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रांसह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. तेव्हा आरबीआयने असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नसल्याचे सांगितले होते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच