Renuka Devi | रेणुका माऊली , कल्पवृक्षाची सावली , आज होणार येल्लम्मादेवीचा जागर, वाचा, आतापर्यंत न वाचलेली रंजक माहिती

| Updated on: Jan 06, 2022 | 6:09 AM

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्राची कुलदेवी आहे. तीची दुसरी ओळख म्हणजे येल्लम्मादेवी.

Renuka Devi | रेणुका माऊली , कल्पवृक्षाची सावली , आज होणार येल्लम्मादेवीचा जागर, वाचा, आतापर्यंत न वाचलेली रंजक माहिती
yallama devi
Follow us on

मुंबई : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्राची कुलदेवी आहे. माहूर गडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे. दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला अशी आख्यायिका आहे.

काय आहे आख्यायिका

एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगराच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू ठेवले. उपवर झाल्यावर तिचे लग्न शंकराचे अवतार मानले गेलेले ऋषी जमदग्नीशी करण्यात आले. ऋषी जमदग्नी हे फार तापट होते. ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे. ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची. एकदा त्या नगराचा राजा सहस्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली. ऋषीने नकार दिला या वर संतापून त्याने ऋषिपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमदग्नी यांना ठार मारले. ऋषिपुत्र परशुराम तेथे आल्यावर घडलेला प्रकार कळाला. त्याच क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपविण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचे निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आई सह भटकंती करत माहूर गडावर आले. इथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले दत्तात्रयांनी त्यांना मदत केली आणि वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली. त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने तिथे मातृ कुंड आणि सर्व कुंड निर्माण करून त्याच पाण्याने अंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यांचा पित्यासह त्यांची माता रेणू देखील सती झाल्या. या माहूर गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे.

रेणुकामाता म्हणजेच येल्लम्मा

रेणुका मातेला काही भागांत, विशेषतः दक्षिणेत येल्लम्मा, मरिअम्मा नावांनी ओळखली जाते. द. भारतातील एक मातृदेवता. कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे तिचे मुख्य स्थान आहे. ती कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या प्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. तिच्या भक्तांमध्ये तथाकथित खालच्या थरातील लोकांची संख्या अधिक आहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ आणि ‘सप्तमातृका’ हे दोन्ही अर्थ तिचे सर्जनशील मातृस्वरूप दर्शवितात.

तृतीयपंथीयांची श्रद्धा

देवदासीच्या अनेक शतकांच्या सुरू असणारी परंपरा आहे. देवाची दासी म्हणजे देवदासी. मंदिरातील देव देवतांची पूजा करणे हेच तिचे काम. या प्रथेमध्ये यामध्ये केसांमध्ये जट निर्माण झालेल्या 14 किंवा 15 वर्षांची मुलं मुली देवाला वाहिली जातात. पूर्वी त्यांना खंडोबा, अंबाबाई – जोगवीण , खळनाथ-भावीण, भूतनाथ -नायकीण , महाबलेश्वर- कलावंतीण, दारेश्वर , बसवी, मायव्वा, अशी नावे दिली जायची. या सर्व देवता यल्लमाचा अंश आहेत अशी मान्यता आहे,

संदर्भ – मराठी विश्वकोश
महाराष्ट्र शासन नांदेड जिल्हा संकेतस्थळ
पुस्तक – देवदासी आणि नग्नपूजा (लेखक उत्तम कांबळे) पृष्ठ क्रमांक 54

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Paush Amavasya : कोणतंच काम नीट होत नाही? पितृदोष असू शकतात कारणीभूत, पौष अमावस्येला काही उपाय नक्की करुन पाहा

Vastu Tips | काहीही झालं तरी चालेल पण या 5 गोष्टी कधीच कोणाला वापरु देऊ नका, नाहीतर …

Vastu Tips | सावधान ! वास्तू दोष तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करू शकतात, आजच करा योग्य ते बदल