AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाच्या आरतीचे आहेत काही नियम, योग्य पद्धतीने आरती केल्यास मिळते पूर्ण फळ

सनातन परंपरेत देवासाठी केल्या जाणाऱ्या आरतीला मोठं महत्त्व आहे. कोणत्याही मंदिरात किंवा घरात आरतीच्या वेळी आपले मन भगवंताच्या भक्तीत मग्न होते. वास्तविक आरती पूजेची ती पद्धती आहे जी कल्याने पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होतो आणि देवताची कृपा होते. आरतीला 'आरार्तिक' आणि 'नीरांजन' म्हणून देखील ओळखले जाते.

देवाच्या आरतीचे आहेत काही नियम, योग्य पद्धतीने आरती केल्यास मिळते पूर्ण फळ
Arati
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 21, 2021 | 12:06 PM
Share

मुंबई : सनातन परंपरेत देवासाठी केल्या जाणाऱ्या आरतीला मोठं महत्त्व आहे. कोणत्याही मंदिरात किंवा घरात आरतीच्या वेळी आपले मन भगवंताच्या भक्तीत मग्न होते. वास्तविक आरती पूजेची ती पद्धती आहे जी कल्याने पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होतो आणि देवताची कृपा होते. आरतीला ‘आरार्तिक’ आणि ‘नीरांजन’ म्हणून देखील ओळखले जाते. पुराणात आरतीच्या वैभवाची प्रशंसा करताना असे म्हटले आहे की जर एखाद्याला मंत्र वगैरे माहित नसेल तर त्याला त्या पूजा-विधीचे पूर्ण फळ भक्तीने मिळू शकेल. पूजेमध्ये आरती करण्याचे महत्त्व आणि पद्धत जाणून घेऊया (Rules For Doing Aarti To Worship God Know The Rules) –

✳️ देवाच्या पूजेसाठी आरती साधारणत: सकाळी आणि संध्याकाळी घरात केली जाते परंतु दिवसात ती एक ते पाचवेळा केली जाऊ शकते.

✳️ पूजेमध्ये आरती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दिवे किंवा वाती किंवा कापराची संख्या एक, पाच किंवा सात पर्यंत ठेवू शकते.

✳️ आरती करताना प्रथम ती चार वेळा आपल्या आराध्यच्या चरणांकडे, नंतर दोनदा नाभीकडे आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने फिरवा. असे एकूण सात वेळा करा. आरती झाल्यानंतर त्यावरुन पाणी फिरवा आणि सर्व लोकांवर प्रसाद स्वरुपात शिंपडा.

✳️ आरती नेहमीच मोठ्या आवाजात आणि एका लयीत गायली जाते. असे केल्याने पूजास्थळाचे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते आणि मनाला शांती मिळते.

✳️ स्थायी स्थितीत आरती करण्याची नेहमीची परंपरा आहे. परंतु, आरोग्याच्या कारणास्तव आपण आरती करण्यास असमर्थ असाल तर आपण देवाला क्षमा मागून देखील आरती करु शकता.

✳️ आरतीनंतर दोन्ही हातांनी ती ग्रहण करण्याचा नियम आहे. मान्यता आहे की देवाची शक्ती आरतीच्या दिव्याच्या ज्योतीत असते, ज्यावरुन भक्त हात फिरवून आणि आपल्या डोक्यावर ग्रहण करतात.

✳️ आरती केल्याने पूजेतील कोणत्याही प्रकारची चूक-भूल माफ केली जाते आणि त्याचा पूर्ण लाभ मिळतो.

Rules For Doing Aarti To Worship God Know The Rules

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaturmas 2021 | आजपासून चार महिने शुभ कार्यांवर बंदी, जाणून घ्या चातुर्मासाचे महत्त्व आणि यासंबंधी सर्व माहिती

Devshayani Ekadashi 2021 | देवशयनी एकादशीपासून देवतांचा शयनकाळ का सुरु होतो, जाणून घ्या याचं वैज्ञानिक महत्त्व

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान