घुबड दिसणे शुभ की अशुभ? रात्रीच्या वेळी दिसल्यास काय असते संकेत

हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. जसे की रात्रीच्या वेळी घुबड दिसणे हे शुभ आहे की अशुभ याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असेल. अनेकांना रात्री घुबड दिसते. रात्री घुबड दिसणे हे कोणत्या गोष्टींचे संकेत देते. किंवा जर ते पांढरे घुबड असेल तर त्या मागची भावना काय आहे. ते शुभ असते की अशुभ जाणून घ्या.

घुबड दिसणे शुभ की अशुभ? रात्रीच्या वेळी दिसल्यास काय असते संकेत
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 5:31 PM

घुबड पाहणे शुभ की अशुभ : हिंदू धर्मात अनेक पक्षी आणि प्राणी यांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकीच एक म्हणजे घुबड. हिंदू धर्मात घुबडांशी संबंधित अनेक समजुती आहेत. घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. आपल्या देशात घुबड अनेकदा रात्रीच दिसतात. अनेकांना घुबड दिसणे हे शुभ आणि अशुभ असल्याची मान्यता आहे. घुबडबाबत काही समजूती आहेत.

पांढरे घुबड पाहणे

आपण सर्वांनी काळे किंवा तपकिरी रंगाचे घुबड पाहिले असेल. पण हिंदू धर्मग्रंथानुसार पांढरे घुबड पाहणे खूप शुभ मानले जाते. पांढऱ्या रंगाचे घुबड क्वचितच दिसते. पण जर पांढरे घुबड दिसले तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या संपणार आहेत असे मानले जाते. पांढरे घुबड दिसल्यास काहीतरी शुभ घडणार असल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात, पांढरे घुबड हे आपल्या पूर्वजांची आत्मा असल्याचं बोलले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला पांढरे घुबड दिसले तर याचा अर्थ त्याचे पूर्वज त्याच्यासोबत आहेत असे असते.

घुबडांचे सतत दर्शन होणे

अनेक वेळा जर रात्री अचानक तुम्हाला घुबड दिसत असतील तर किंवा ते तुमच्याकडे एकटक पाहत असेल किंवा तुमची आणि घुबडाची नजरानजर झाली असेल तर तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. असे मानले जाते. तुमच्या आयुष्यातून आर्थिक समस्या लवकरच संपुष्टात येण्याची ही चिन्हे असतात. तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल तर तुम्हाला ते शुभ मानले जाते. तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते नक्कीच यशस्वीपणे पूर्ण कराल असे मानले जाते.

दिवसा घुबड दिसणे

घुबड अनेकदा रात्रीच पाहायला मिळतात. पण जर कोणाला ते दिवसा दिसले तर ते देखील शुभ मानले जाते. तुम्हाला तुमच्या नशीबाची साथ मिळेल याचे ते संकेत देते. तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक होणार असल्याचे ते संकेत देते. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

रात्री घुबड पाहणे

घुबड हे लाजाळू असल्याचे मानले जाते. ते खूप कमी लोकांकडे पाहतात, परंतु जर तुम्हाला रात्रीच्या वेळी घुबड दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाते. रात्री घुबड दिसणे समस्यांपासून मुक्तता दर्शवते. याशिवाय, ते करिअरमधील प्रगती देखील दर्शवते. रात्री घुबडाचा आवाज ऐकणे हे शुभवार्ता मिळण्याचे लक्षण आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.