AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaniwar Upay : शनिवारचे हे पाच उपाय आहेत फारच प्रभावी, साडेसातीचा त्रास होतो कमी

असे म्हणतात की शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच त्याला न्यायदेवता आणि कर्माचा दाता म्हणतात. जर कुंडलीत शनि बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात खूप यश मिळते.

Shaniwar Upay : शनिवारचे हे पाच उपाय आहेत फारच प्रभावी, साडेसातीचा त्रास होतो कमी
शनीदेवImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 07, 2023 | 8:02 PM
Share

मुंबई : शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी जो व्यक्ती शनिदेवाची विधिवत पूजा करतो (Shaniwar Upay) त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. शनिदेवाला कर्माचा दाता म्हणतात. ते प्रत्त्येकाच्या कर्माचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार त्याचे फळ लोकांना देतात. म्हणूनच असे म्हटले जाते की, शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्वाचे आहे. त्यांना आनंदी ठेवल्याने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि मन प्रसन्न राहते, म्हणून आज  आम्ही तुम्हाला शनिवारी केलेल्या काही उपायांबद्दल सांगणार आहोत, जे केल्याने माणसाच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.

शनिवारी करायचे हे पाच उपाय आहेत फारच प्रभावी

1. शनिवारी न कापलेले किंवा न फाटलेले 11 पिंपळाच्या पानांच्या हार बनवा आणि तो हार शनि मंदिरात शनिदेवाला अर्पण करा. ॐ शं शनैश्चराय नमः। मंत्राचा 21 वेळा जप करा. त्यामुळे कोर्ट कचेरी संबंधीत सर्व अडचणी दूर होतील.

2. शनिवारी पिंपळाच्या झाडाभोवती कच्चा कापसाचा धागा गुंडाळा आणि 7 वेळा प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा करताना ॐ शं शनैश्चराय नमः। या मंत्राचा अवश्य जप करा. असे केल्याने प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात.

3. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ अर्पण करा. तिळाच्या तेलाचा दिवा लावा.

4. जर तुम्हाला नोकरीत यश मिळवायचे असेल तर शनिवारी पाण्यात काळा कोळसा प्रवाहित करा आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा अवश्य जप करा. यामुळे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.

5. जर तुम्हाला घरात सुख-समृद्धी आणायची असेल तर शनिवारी एका ग्लास पाण्यात थोडी साखर टाकून ती पिंपळाच्या झाडाच्या मुळाला अर्पण करा आणि या मंत्राचा 108 वेळा जप करा – ‘ऊँ ऐं ह्रीं श्री शनैश्चराय नमः’

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.