AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Tandav Stotra : स्वतःचा जीव वाचविण्यासाठी रावणाने केली होती महादेवाची स्तुती, अशी आहे पौराणिक कथा

आपल्या पैकी बऱ्याच जणांना शिव तांडव स्तोत्र माहिती असेल, तसेच ते रावणाने रचले हेही अनेकांना माहिती असेल, मात्र रावणाने ते कोणत्या परिस्थितीत रचले हे तुम्हाला माहिती आहे का?

Shiv Tandav Stotra : स्वतःचा जीव वाचविण्यासाठी रावणाने केली होती महादेवाची स्तुती, अशी आहे पौराणिक कथा
शिव तांडवImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 30, 2023 | 1:57 PM
Share

मुंबई : रावण हा भगवान शिवाचा प्रखर भक्त होता आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने एक विशेष स्तुती रचली, जी शिव तांडव स्तोत्र म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की शिव तांडवच्या (Shiv Tandav Stotra) उगमामध्ये ती शक्ती आहे जी महादेवाला आशीर्वाद देण्यास भाग पाडते. श्रावणाच्या सोमवारी नियमितपणे शिव तांडव स्तोत्राचे पठण केल्यास भोलेनाथाकडून कोणतेही वरदान मिळू शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे स्तोत्र ज्या परिस्थितीत रचले गेले ती रावणासाठी अतिशय कठिण परिस्थिती असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया शिव तांडव स्तोत्राबद्दल सर्व काही.

शिव तांडव स्तोत्र म्हणजे काय?

शिव तांडव स्तोत्र हे भगवान शिवाचे परम भक्त रावणाने गायलेले एक विशेष भजन आहे. ही स्तुती छंदोबद्ध आहे आणि त्यात अनेक अलंकार आहेत. रावण जेव्हा कैलास पर्वत घेऊन चालू लागला तेव्हा भगवान शिवाने आपल्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबला असे म्हणतात. त्यामुळे रावण कैलास पर्वताखाली गाडला गेला. तेव्हा रावणाने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी जी स्तुती केली होती त्याला शिव तांडव स्तोत्र म्हणतात. ज्या ठिकाणी रावण दबला होता ते ठिकाण राक्षस ताल म्हणून ओळखले जाऊ लागले.

तांडव म्हणजे काय?

तांडव हा शब्द ‘तांडुल’ या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ उडी मारणे. तांडवमध्ये शक्ती आणि उसळी मारावी लागते, जेणेकरून मन आणि बुद्धी सामर्थ्यवान बनते. केवळ पुरुषांना तांडव नृत्य करण्याची परवानगी आहे. महिलांना तांडव करण्यास मनाई आहे.

कोणत्या स्थितीत शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे?

जेव्हा आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण होत नाही किंवा तंत्र-मंत्रात अडथळा येत असेल तेव्हा ते केले जाऊ शकते. जेव्हा शत्रू त्रास देतात किंवा आर्थिक आणि नोकरीशी संबंधित समस्या उद्भवतात तेव्हा ते तांडव स्तोत्र पठण करू शकतात. जीवनात काही विशेष यश मिळवण्याची इच्छा असेल किंवा ग्रहांची स्थिती बिघडली असेल तर तेही करता येते.

शिव तांडव स्तोत्र पठण करण्याचे नियम

सकाळी किंवा प्रदोष काळात शिव तांडव स्तोत्राचे पठण करणे उत्तम. प्रथम भगवान शिवाला नमन करा. त्यांना धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. यानंतर शिव तांडव स्तोत्राचे गायन करा. नृत्यासह पाठ केले तर उत्तम. पाठानंतर भगवान शिवाचे ध्यान करा आणि तुमची प्रार्थना करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.