AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan 2022 : महादेवाचं हेच ते महामंदिर जिथे ब्रम्हदेवाला देण्यात आला होता श्राप!

तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाई (tiruvannamalai temple) जिल्ह्यात शिवाचे मंदिर आहे. अन्नमलाई पर्वताच्या (annamalai parvat) पायथ्याशी असलेल्या या मंदिराला अरुणाचलेश्वर शिव मंदिर (arunachaleswarar temple) म्हणतात. श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. कार्तिक पौर्णिमेलाही जत्रा असते. येथील अन्नमलाई पर्वताची 14 किलोमीटर लांब प्रदक्षिणा करून भाविक महादेवाला नवस करतात. असे म्हणतात की, महादेवाचे हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. पौराणिक […]

Shravan 2022 : महादेवाचं हेच ते महामंदिर जिथे ब्रम्हदेवाला देण्यात आला होता श्राप!
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 19, 2022 | 1:35 PM
Share

तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाई (tiruvannamalai temple) जिल्ह्यात शिवाचे मंदिर आहे. अन्नमलाई पर्वताच्या (annamalai parvat) पायथ्याशी असलेल्या या मंदिराला अरुणाचलेश्वर शिव मंदिर (arunachaleswarar temple) म्हणतात. श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. कार्तिक पौर्णिमेलाही जत्रा असते. येथील अन्नमलाई पर्वताची 14 किलोमीटर लांब प्रदक्षिणा करून भाविक महादेवाला नवस करतात. असे म्हणतात की, महादेवाचे हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, एकदा ब्रह्माजींनी कैलास पर्वत पाहण्यासाठी हंसाचे रूप धारण केले, पण तिथपर्यंत पोहोचण्यास ते असमर्थ होते. वाटेत त्यांना एक एव्हड्याचे फुल पडलेले दिसले. त्यांनी त्या फुलाला कैलास पर्वताबद्दल विचारले. तेव्हा ते फुल म्हणाले की, मी येथे चाळीस हजार वर्षांपासून आहे.

यावरून ब्रह्मदेवाला वाटले की, आपले तिथपर्यंत पोहोचणे शक्य नाही. आपण कैलास पर्वत पहिले आहे अशी खोटी साक्ष देण्यासाठी ब्रम्ह देवांनी केवड्याच्या फुलाला राजी केले. ब्रह्मदेवाच्या या गोष्टीचा भगवान शंकरला राग आला. त्याने ब्रह्मदेवाला शाप दिला की, पृथ्वीवर त्यांचे मंदिर बांधले जाणार नाही. त्याचवेळी केवड्याच्या फुलालाही त्यांनी श्राप दिला की, त्याचा शिवपूजेत वापर होणार नाही. ज्या ठिकाणी भगवान शंकराने ब्रह्माजींना शाप दिला होता. ती जागा म्हणजे तिरुवन्नमलाई.

शिवलिंग दर्शनाचे अनेक फायदे

अरुणाचलेश्वर मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. हा अन्नमलाई पर्वत शिवाचे प्रतीक आहे. पर्वताची उंची 2668 फूट आहे. तिरुवन्नमलाईमध्ये आठ दिशांना आठ शिवलिंगे आहेत. असे मानले जाते की, प्रत्येक लिंगाच्या दर्शनाने अनेक फायदे होतात. कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात दीपदान केले जाते. हे मंदिर पहाटे 5.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते.

कसे जायचे?

चेन्नई ते तिरुवन्नमलाई हे अंतर 200 किमी आहे. या ठिकाणी चेन्नईहून बसने पोहोचता येते. चेन्नईहून वेल्लोर मार्गे किंवा चेन्नईहून विल्लुपुरम मार्गे ट्रेननेसुद्धा जात येणे शक्य आहे. शिवाय खाजगी वाहनाचा पर्याय आहेच.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?